‘आकाश धनगर’च्या कार्याची युनिसेफने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 08:31 PM2020-11-02T20:31:59+5:302020-11-02T20:31:59+5:30
जळगाव : युनिसेफने नवी उमेद - धडपडणारी मुले या सदरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा ...
जळगाव : युनिसेफने नवी उमेद - धडपडणारी मुले या सदरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आकाश धनगर याने कोरोना काळात केलेल्या कायार्ची दखल घेतली आहे.
कोरोनाच्या (कोविड-19) प्रादुभार्वामुळे शासनाने जाहिर केलेल्या टाळेबंदीच्या काळात विद्यापीठाच्या रासेयो विभागाने फेस मास्क तयार करुन वाटप करणे, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे, अर्सेनिक अल्बम-30 या गोळयांची पॅकींग करणे, कोरोना पुस्तिकाचे वाटप करणे, कुटुंबांचे सर्व्हेक्षण करणे तसेच विविध गावात स्थानिक प्रशासनास मदत करणे, पोलिस मित्र व कोरोना योध्दा म्हणून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यापौक्ीच विद्यापीठाचा रासेयो स्वयंसेवक आकाश धनगर याने कोरोना काळातील भयावह परिस्थितीत लोकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती केली. हे करतांना आपल्या मुळे कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एक महिना शहरातील स्वयंसेवकांच्या मदतीने संभाजी नाटयगृहात वास्तव्य केले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 2 महिने गरजूंना अन्न वाटप या सारख्या सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. आकाश धनगरच्या या कायार्ची दखल युनिसेफने नवी उ मेद - धडपडणारी मुले या सदरात घेतली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या नावलौकीकात भर पडली आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांचे रासेयो उपक्रमांना नेहमी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असून प्र-कुलगुरु प्रा. पी.पी.माहुलीकर, राज्य संपर्क अधिकारी डॉ.अतुल साळुंखे, क्षेत्रीय संचालक कार्तिकेन, व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, रासेयो संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे आदींनी अभिनंदन केले आहे.