जळगावात धावत्या बसखाली झोकून देत अनोळखी तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:39 PM2017-10-24T12:39:54+5:302017-10-24T12:40:50+5:30

पाऊण तास वाहतूक ठप्प

Unidentified youth commits suicide in Jalgaon | जळगावात धावत्या बसखाली झोकून देत अनोळखी तरुणाची आत्महत्या

जळगावात धावत्या बसखाली झोकून देत अनोळखी तरुणाची आत्महत्या

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - शहरातील अत्यंत वर्दळीच्या स्वातंत्र्यचौकातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोर धावत्या बसखाली स्वत:ला झोकून देत एका अनोळखी 36 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 12़.20 वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेनंतर पाऊणतास चौकात वाहतूक ठप्प झाली होती़ या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच आत्महत्येचे कारणही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आह़े
अशी घडली घटना..
पोलीस सूत्र व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, नवीन बसस्थानकातून दुपारी 12़.15 वाजेच्या सुमारास जळगाव-औरंगाबाद (क्र ़ एम़एच़20, बी़एल़2162) ही बसमार्गस्थ झाली़ स्वातंत्र्य चौकात पोहचली असता जि़प़अध्यक्ष उज्‍जवला पाटील यांच्या निवासस्थानासमोर उभ्या असलेल्या एका तरुणाने धावत्या बसच्या मागच्या चाकात स्वत:लाझोकून दिल़े यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचा:यांनी घटनास्थळ गाठल़े 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
खिशात सापडल्या गांजाच्या पुडय़ा
मयत अनोळखी तरुणाच्या खिशात गाजांच्या पुडय़ा आढळून आल्याचे पोलीस उपनिरिक्षक गिरधर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल़े त्यावरुन पोलिसांकडून अधिकमाहिती काढली जात असून त्याची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आह़े आत्महत्या का केली? याचेही कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयार्पयत वाहनाच्या रांगा
ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी प्रचंड वाहतूक या चौकातून सुरु होती. अपघात झाल्याने स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यानची वाहने जागेच्या जागी थांबली. त्यामुळ ेवाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. बसस्थानकातून निघालेल्या बसेस तसेच दुचाकी, रिक्षा व इतर वाहनाची रांग पोलीस अधीक्षक कार्यालयार्पयत लागली होती़ वाहतूक पोलीस व जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत केली़ नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल़े तब्बल पाऊण तासानंतर वाहतूक सुरळीत झाली़
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ़ कुरकुरे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े पोलीस उपनिरिक्षक मनोज वाघमारे प्राथमिक तपास करत आह़े  तरुणाने आत्महत्या केली की बसचालकाने त्याला उडविले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून चौकातील सीसीटीव्ही कॅमे:यांचे फुटेजही तपासण्यात येणार आह़े
जळगाव-औरंगाबाद या बसवरील वाहक महिला कर्मचारी आऱआऱवढोडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की हा तरुण दुभाजकाजवळ उभा होता, बस स्वातंत्र्य चौकात येताच त्याने बसच्या दिशेने उडी मारली, त्यात तो मागील चाकात सापडला व गतप्राण झाला.
प्रत्यक्षदर्शी म्हणतात..
बसच्या मागे असलेल्या दुचाकीवरुन जात असलेल्या प्रत्यक्षदर्शी शिरसोली येथील भिमा नामदेव बारी यांनीही तरुणाने बसखाली उडी मारल्याचे सांगितल़े अपघातानंतर पोलिसांनी बस पोलीस ठाण्यात नेली. 

Web Title: Unidentified youth commits suicide in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.