गोंडगावच्या शेतकऱ्यांची कोरोना काळातही अनोखी शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:35+5:302021-06-18T04:12:35+5:30

भडगाव : आजकाल शेती करणे परवडत नाही. शेती पिकांवर अमाप खर्च करूनही ...

Unique farming of Gondgaon farmers even during Corona period | गोंडगावच्या शेतकऱ्यांची कोरोना काळातही अनोखी शेती

गोंडगावच्या शेतकऱ्यांची कोरोना काळातही अनोखी शेती

Next

भडगाव : आजकाल शेती करणे परवडत नाही. शेती पिकांवर अमाप खर्च करूनही चांगले उत्पन्न आकारत नाही. कारण कधी पाण्याची कमतरता तर कधी निसर्गाची वक्रदृष्टी, बऱ्याचदा माल आकारुनही मालाला भाव मिळत नाही. कोरोना काळातही शेती पिकांना नुकसानीचेच ठरले. मात्र गोंडगाव येथील एकनाथ वेडू कुंभार या शेतकऱ्याने चक्क २ एकर क्षेत्रात टरबूज व वांगे पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली. चांगल्या नियोजनाने मेहनतीने चांगले शेती उत्पन्न फुलविल्याचे चित्र आहे. या पिकांवर फक्त ६० हजार खर्च करून आतापर्यंत जवळपास १ लाख ९० हजारांचे उत्पन्न काढण्यात यश मिळविले आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एकनाथ कुंभार या शेतकऱ्याची २ एकर जमीन गोंडगाव शिवारात आहे. ही जमीन गोंडगाव ते कनाशी रस्त्याला लागूनच आहे. त्यांनी या २ एकर क्षेत्रात टरबूज व वांगे पिकांची लागवड करून आंतरपिकाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळातही न डगमगता या शेतकरी परिवाराने चांगले नियोजन व मेहनतीने या पिकांचा हिरवळीने मळा फुलविला. त्यांनी १० जानेवारी २०२१ रोजी २ एकर टरबूज लागवड केला. त्याचवेळी मल्चिंग पेपरचा वापर केला व ठिबक सिंचनवर वांगे पिकाचीही लागवड केली. टरबुजाची दीड फुटावर लागवड केली व वांगे पिकाची दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी अडीच फुटावर अंतरावर लागवड केली.

डबल पिकांमुळे रासायनिक खत व औषध फवारणीचा खर्च वाचला. खर्च कमी आला. आंतरपीक शेती पद्धती फायद्याची ठरत गेली. सुरुवातीस १ एप्रिलपासून टरबूज पिकांचे उत्पन्न सुरू झाले तर १० एप्रिलपासून वांगे पिकाचे उत्पन्न सुरू झाले. टरबूजला सुरुवातीला ८ रुपये ३० पैसे प्रति किलो भाव मिळाला. सध्या आंब्यांचे उत्पन्न मार्केटला पोहोचल्याने टरबूजला फक्त प्रति किलो ३ ते ४ रुपये भाव मिळाला. टरबूज पीक आता संपल्यात जमा आहे. या पिकाला सध्या शेवटी शेवटी भावाचा फटका बसला. तसेच वांगे पिकाला सुरुवातीस प्रति २२ रुपये किलो भाव मिळाला. सध्या मात्र वांगे मार्केटला १२ ते १३ रुपये प्रति किलो भावाने विक्रीसाठी जात आहे. वांग्याचे फारसे उत्पन्न आकारले नसले तरी यापुढेही वांग्याची तोडणी सुरूच आहे. पुढेही चांगले उत्पन्न आकारण्याची आशा आहे.

आम्ही २ एकर क्षेत्रात टरबूज व वांगे पिकाची लागवड केली. योग्य नियोजन व मेहनतीने मळा फुलविला. दोघ पिकांवर फक्त ६० हजार रुपये खर्च झाला. जवळपास एकूण १ लाख ९० हजार उत्पन्न निघाले आहे. शेतमालाला भाव वाढीव मिळाला असता तर जास्त उत्पन्न आकारले असते. मात्र शेतकऱ्याचा चांगला माल निघूनही शासन चांगला भाव देत नाही.

-एकनाथ वेडू कुंभार, प्रगतशील शेतकरी, गोंडगाव, ता. भडगाव

===Photopath===

170621\17jal_5_17062021_12.jpg

===Caption===

गोंडगाव शिवारात एकनाथ कुंभार व बबलु कुंभार आदी परिवार टरबूज, वांगे माल कॅरेटमध्ये भरताना.

Web Title: Unique farming of Gondgaon farmers even during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.