उन्मेष पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:20+5:302021-06-27T04:12:20+5:30
सांगता सायंकाळी चाळीसगाव येथील पाटीदार मंगल कार्यालयात झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्याने झाली. आयुष्मान भारत योजनेतून कोरोनासह १,३०० प्रकारच्या आजरांवर प्रतिवर्ष ...
सांगता सायंकाळी चाळीसगाव येथील पाटीदार मंगल कार्यालयात झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्याने झाली. आयुष्मान भारत योजनेतून कोरोनासह १,३०० प्रकारच्या आजरांवर प्रतिवर्ष मोफत उपचार देणाऱ्या मतदारसंघातील ८ लाख २२ हजार जनतेला डिजिटल कार्ड वाटप करण्याचे नियोजन केले आहे. सात्यत्याने जनतेच्या विकासासाठी नेहमीच रात्रंदिवस पाठपुरावा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत राहू, अशी ग्वाही सत्काराप्रसंगी खा. पाटील यांनी दिली. यावेळी भाजपचे राज्य प्रवक्ते संजय शर्मा, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, सुरेश महाराज, के.बी. साळुंखे, सुनील पाटील, संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक जिल्हाभरातील आजी माजी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
ब्राह्मणशेवगे येथील निसर्ग टेकडीवर खासदार उन्मेष पाटील यांनी पत्नी व उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या प्रमुख संपदा पाटील यांच्या हस्ते सकाळी वृक्षारोपण करून उपक्रमांना सुरुवात करण्यात आली.
जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, नगरसेवक धीरज सोनवणे, माजी नगरसेवक आबासाहेब कापसे, अतुल हाडा, मनोज काळे, मनोज भांडारकर, अरविंद देशमुख, अभियंता प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. पाचोरा, भडगाव व जळगाव येथे वीज खांबांसह एलईडी दिव्यांचेही लोकार्पण करण्यात आले. माजी पं. स. सदस्य दिनेश बोरसे यांनी सूत्रसंचलन केले.
===Photopath===
260621\26jal_4_26062021_12.jpg
===Caption===
बहाळ - पातोंडा कल्स्टरचे भूमीपुजन करतांना खा. उन्मेष पाटील. सोबत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.