भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या रुग्णालयासमोर असलेल्या कचरापेटी जवळ वापरलेले पीपीई कीट, मास्क, हॅण्डग्लोज मोठ्या प्रमाणात बाहेर सोमवारी रात्री उघड्यावर फेकलेले आढळले. यामुळे परिसरातील लोकांनी संतप्त भावना व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरांनी या बाबीचा इन्कार केला आहे.सोमवारी रात्री नऊला जामनेर रोडवरील डॉ.कोळंबे यांच्या रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात पीपीई कीट, मास्क, हॅण्डग्लोज वापरून फेकलेले आढळले. या ठिकाणी श्वानासह लहान मुले खेळत होती. आधीच कोरोना बाधीत रुग्णांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना वापरलेले साहित्य फेकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधितांंवर दंडात्मक कारवाई करून रुग्णालय सील करण्याची मागणी दीनदयाल नगरातील नागरिक तसेच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, शिवसेनेचे धनराज ठाकूर यांनी केली आहे.नागरिक जमले घटनास्थळीरुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात पीपीई किटसह इंजेक्शन, मास्क, हॅण्डग्लोज उघड्यावर फेकल्याची माहिती मिळताच प्रभागातील नागरिक व लोकप्रतिनिधी घटनास्थळी जमा झाले. पालिकेला याबाबत माहिती देण्यात आली. माहिती दिल्यानंतर तीन तास उशिरा रात्री १२ वाजता पालिकेची कचरा गाडी घटनास्थळी दाखल झाली.उपस्थित नागरिकांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज व साहित्य देऊन वापरलेले पीपीई किट उचलण्याचे सांगितले.दरम्यान, फेकून देण्यात आलेल्या किटमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जे लोक यासाठी जबाबदार असतील अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच संबंधित रुग्णालय सील करावे, अशी मागणी प्रांत कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढलीवापरलेले कीट रस्त्यावरच फेकून दिल्यामुळे या ठिकाणी लहान मुलांसह इतर लोकांचा संपर्क तर आला नाही ना, शिवाय वापरलेले किट हे सामान्य लोकांनी वापरलेले किंवा बाधीत रुग्णांसाठी वापरण्यात आले, यामुळे तर्कवितर्क लावत आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.शहरात हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत असताना मध्येच अशा घटनांमुळे संतापाची लाट पसरली आहे.दरम्यान, काही दिवसापूर्वी वांजोळा रोडवरही वापरण्यात आलेले पीपीई किट उघडपणे फेकून देण्यात आले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.माझ्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक कचरापेटीत सामान माझा नाही. माझ्याकडे स्वच्छतेसाठी व्यावसायिक सफाईदार आहेत. हॉस्पिटलला बायोमेट्रिक वेस्टेज कचरा ‘मन्साई’ला (आयएमएतर्फे कचरा संकलित करणारी एजंसी) नियमित जातो. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य काय ते समोर येईलच. बदनाम करण्याचा व त्रास देण्याचे षङ्यंत्र आहे. पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नाही. परिसरामध्ये अजूनही रुग्णालय आहे. कोरोना काळात आम्ही स्वत: रुग्णाला दक्षता घ्यायला सांगतो. त्यामुळे हा आरोप षङ्यंत्राचा एक भाग आहे.-डॉ.स्वप्नील कोळंबे, भुसावळ
वापरलेले पीपीई किट, ग्लोज, मास्क रुग्णालयाबाहेर उघड्यावर फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 3:13 PM
दीनदयाल नगरसमोरील एका खासगी हॉस्पिटलसमोर हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले साहित्य भर रस्त्यात टाकून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देभुसावळ शहरातील प्रकारनागरिकांनी केला व्यक्त संताप संबंधितांवर कारवाईची लोकसंघर्ष मोर्चाची मागणीडॉक्टरांकडून मात्र इन्कार