आॅनलाईन लोकमतजळगाव : सोशल मीडियावर ओळख, त्यातून मैत्री व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने पाथरी, ता.जळगाव येथील तरुण व उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्यातील महादरपूर येथील तरुणी एकमेकाच्या भेटीसाठी आतूर झाले. दोघांनी गोरखपूर रेल्वे स्थानक गाठले. तेथून त्यांनी थेट पाथरी गाठले. दरम्यान, मुलगी घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. तिच्या शोधासाठी निघालेले पोलीस पाथरीत पोहचलेही, मात्र मुलीने पोलीस व पालकांसोबत जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याने पोलीस व नातेवाईकांना आल्या पाऊली माघारी जावे लागले.चित्रपटात शोभेले अशा या घटनेबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाथरी येथील सनी (वय २३, नाव बदलले आहे) हा तरुण पुणे येथे एका रेस्टॉरंटमध्ये कामाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्यातील महादरपूर येथील गौरी (वय २१, नाव बदलले आहे) या तरुणीशी दोन वर्षापूर्वी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पे्रमात झाले. दोन्हीही प्रेमात इतके बुडाले की त्यांना एकमेकाच्या भेटीची ओढ लागली. त्यासाठी दोघांनी भेटीचे ठिकाण गोरखपूर रेल्वे स्टेशन निवडले. सनी हा पुणे येथून गोरखपुर येथे ३ मार्च रोजी पोहचला तर गौरी तिच्या गावातून तेथे पोहचली. दोघांची ठरल्याप्रमाणे भेट झाली.न्यायालयाने दिली तारीखसनी व गौरी यांनी तेथून रेल्वेने जळगाव व तेथून पाथरी गाठले. सहा मार्च रोजी दोघं पद्मालय येथे गणपती मंदिरात गेले. तेथे मित्रांच्या साक्षीने धार्मिक पध्दतीने लग्न केले. कायदेशीर अडचण नको म्हणून दोघांनी तेथून जळगाव गाठले. त्याच दिवशी लग्नाची नोंदणी केली. नियमाप्रमाणे नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष विवाहासाठी एक महिन्याची तारीख देण्यात येते. त्या दिवशी त्यांना पुढच्या महिन्यात कायदेशीर लग्नाची तारीख मिळाली आहे.
फेसबुकवर मैत्री केलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणीचे जळगावच्या तरुणसोबत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:23 PM
सोशल मीडियावर ओळख, त्यातून मैत्री व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने पाथरी, ता.जळगाव येथील तरुण व उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्यातील महादरपूर येथील तरुणी एकमेकाच्या भेटीसाठी आतूर झाले. दोघांनी गोरखपूर रेल्वे स्थानक गाठले. तेथून त्यांनी थेट पाथरी गाठले.
ठळक मुद्दे गोरखपूर येथे एकत्र आले दोघे दोन वर्षापूर्वी झाली फेसबुकवर मैत्री पोलीस व पालकांसोबत जाण्यास तरुणीचा नकार