रविवारीही सुरू राहणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:31 AM2021-02-21T04:31:56+5:302021-02-21T04:31:56+5:30
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यासाठी यंत्रणेला २० फेब्रवारीपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी ...
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यासाठी यंत्रणेला २० फेब्रवारीपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी बऱ्याच केंद्रावर नियमीतच्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे लसीकरण झाले. मात्र, उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने आता रविवारीही कोरेाना लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
शनिवारी जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ९४७ जणांनी लस घेतली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व गोल्ड सीटी हॉस्पीटल येथे शंभरापेक्षा अधिक अनुक्रमे १०५ व १०८ जणांनी लस घेतली तर ४०८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जीएमसीत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर्विकर यांनीही लस घेतली.
५४ टक्के लसीकरण
आरोग्य कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ५४ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली होती. यातील पंधरा टक्के कर्मचाऱ्यांना रक्ताचे विकार असल्याने त्यांना लस घेता येणार नाही आणि अद्यापही काही कर्मचाऱ्यांमध्ये भीती असल्याने हे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे.
दुसऱ्या डोसच्या १४ दिवसानंतर येईल प्रतिकारक्षमता
लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती दुसऱ्या डोसच्या किमान १४ दिवसानंतर पहिल्या डोसच्या ४२ दिवसानंतर विकसती होते. तोपर्यंत कोरोना नाकारता येत नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिले आहे. प्रशासनाचे आवाहनात्मक पत्र काढून लसीकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.
आयसीएमआर, केंद्रीय आरोग्य खाते आणि संबधित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार कोविड प्रतिबंधात्मक दोनही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या सुरक्षित व परिणामकारक आहेत. लसीबाबतच्या गैरसमजूत आणि अफवांपासून सावध रहावे, लस घेतल्यानंतर किरकोळ त्रास जाणवल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करणे, हात धुणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.