पाचोरा येथे रंगल्या महिलांच्या विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 04:30 PM2019-03-13T16:30:58+5:302019-03-13T16:32:58+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त पंचरत्न प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे महिलांसाठी विनोदी उखाणा स्पर्धा, ठिपक्यांची रांगोळी, एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.
पाचोरा, जि.जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त पंचरत्न प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे महिलांसाठी विनोदी उखाणा स्पर्धा, ठिपक्यांची रांगोळी, एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.
पंचरत्नच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनी उद्घाटन केले. व्यासपीठावर रत्ना पाटील, प्रियंका पाटील, मंजुश्री शिरसमणे, प्राजक्ता गरुड, आरती कदम, जयश्री कदम हे उपस्थित होते. प्रास्ताविक वैशाली पाटील यांनी केले. परीक्षण शोभा थेपडे आणि अश्विनी काळे यांनी केले.
स्पर्धेचे विजेते असे-
विनोदी उखाणा स्पर्धा- सोनाली येवले, द्वितीय- प्रतिभा बडगुजर, तृतीय- विजया लाहोटी, उत्तेजनार्थ-शीतल पाटील. ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा- प्रथम- योगिता पाटील, द्वितीय-सविता पाटील, तृतीय-अनघा येवले, उत्तेजनार्थ-उज्वला करवंदे, सिंधू जोशी, सोलो डान्स स्पर्धा प्रथम-सुवर्णा महाजन, द्वितीय- अश्विनी मोरे, तृतीय-सीमा झंवर, उत्तेजनार्थ- ऋतुजा देशपांडे.
प्रेक्षकांमध्ये सरप्राईज गिफ्ट रजनी दलाल, सुरेखा पाटील, अरुणा वाणी, प्रतिभा बडगुजर, अरुणा वाणी, योगिता पाटील, अंजली सिनकर, माधुरी येवले, अंजली सिनकर यांनी प्रश्नोत्तर आणि गेममधून पटकावले. सूत्रसंचालन जयश्री पाटील, आभार प्रियंका पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब अध्यक्ष रोहन पाटील, गोपाल पटवारी, शैलेश खंडेलवाल, पंचरत्न प्रतिष्ठानच्या सचिव जयश्री पाटील, चारुशीला पाटील, सारिका पाटील,जया खंडेलवाल, शीतल पटवारी, वर्षा पाटील यांनी प्रयत्न केले. स्पर्धेसाठी रितेश कदम यांचे सहकार्य लाभले.