गाव वाघोड अन् रेल्वेस्थानक वाघोडा दोघांना सांधणारा मात्र रस्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 06:40 PM2018-10-31T18:40:08+5:302018-10-31T18:41:13+5:30
रावेर तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्ग वा प्रमुख ग्रामीण मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात समाविष्ट करण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उभय रेल्वेस्थानक वाघोडवासीयांना रस्त्याअभावी कोसो दूर ठरत आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांची फरफट होत आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्ग वा प्रमुख ग्रामीण मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात समाविष्ट करण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उभय रेल्वेस्थानक वाघोडवासीयांना रस्त्याअभावी कोसो दूर ठरत आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांची फरफट होत आहे.
वाघोड गाव तालुक्यात स्वातंत्र्य संग्रामातील १९४२ च्या ब्रिटिश चले जाव आंदोलनात मैलाचा दगड म्हणून ठरले आहे. त्यांच्या या समरगाथेचे सदैव स्मरण राहावे म्हणून ब्रिटिशांनी खानापूर नजीकच्या रेल्वेस्थानकाला वाघोड गावाच्या नावाचा अपभ्रंश करून वाघोडा नाव दिल्याचा पूर्वातिहास आहे. वाघोड गावाच्या नावाचा अपभ्रंश करून वाघोडा नाव या मध्यरेल्वेच्या स्थानकाला दिले असले तरी, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ७१ वर्षे लोटली तरी सदरील रेल्वेस्थानक व वाघोड गावाला सांधणाºया रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाडी रस्त्याचा मात्र लोकप्रतिनिधींना व सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला आहे.
वाघोड गावातील थोर स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाच्या चिरंतन स्मृतींसाठी ब्रिटिशांनी वाघोडा स्थानकाचे नामकरण केले. मात्र त्या स्मृतींना उजाळा देताना त्या स्थानकाला उभय ग्रामस्थांच्या संपर्कात आणण्यासाठी रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या पूर्वापार गाडी रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृती आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकारने स्वातंत्र्योत्तर काळातही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
वाघोड गावातील रेल्वे प्रवाशांना पूर्वापारप्रमाणे बैलगाडीतून रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाडी रस्त्याने ने-आण केली जात होती. मात्र आता फास्टफूडच्या जमान्यात कुणीही बैलगाडीत बसायला तयार नसल्याने थेट वाघोडा स्थानकावर कर्जोदमार्गे पाच कि.मी.च्या फेºयाने मोटारसायकल, रिक्षा वा मिळेल त्या वाहनाने जाण्याची तसदी घ्यावी लागत असल्याची शोकांतिका आहे. यामुळे हा फेरा वाचवण्यासाठी पूर्वापारप्रमाणे या खानापूर-वाघोड गाडी रस्त्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने कृती आराखड्यात समावेश करून अधिकृत प्रमुख जिल्हा मार्ग वा इतर जिल्हा मार्गाचा अधिकृत दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.