हनुमान मंदिराला भेट दिली २० किलोची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:16 AM2021-07-25T04:16:14+5:302021-07-25T04:16:14+5:30
एरंडोल : येथील गांधीपुरा भागातील रहिवासी तथा मुंबईस्थित व किर्गीस्तानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ...
Next
एरंडोल : येथील गांधीपुरा भागातील रहिवासी तथा मुंबईस्थित व किर्गीस्तानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गांधीपुरा भागातील हनुमान मंदिराला २० किलो वजनाची पितळाची घंटा भेट म्हणून दिली.
२४ जुलै रोजी देवेंद्र साळी व त्यांचे लहान बंधू संदीप साळी यांच्या हस्ते घंटीचे विधिवत पूजन करण्यात आले, यावेळी सर्वांनी हनुमानाची आरती केली.
यावेळी बाळू चौधरी, चिंतामण पाटील, दशरथ चौधरी, संजय पाटील, सुनील चौधरी, प्रदीप मराठे, गणेश साळी, शालिग्राम गायकवाड, प्रमोद बडगुजर, शरद पाटील, दिनेश घुगे, पवन पाटील आदी उपस्थित होते.