वेफर्स विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:15 AM2021-07-26T04:15:32+5:302021-07-26T04:15:32+5:30
जळगाव : कल्याणी नगरात राहणाऱ्या वेफर्स विक्रेत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भगवान जगन्नाथ ...
जळगाव : कल्याणी नगरात राहणाऱ्या वेफर्स विक्रेत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भगवान जगन्नाथ महाजन (४५) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भगवान महाजन हे कल्याणी नगरात पत्नी, मुलगा व मुलीसह वास्तव्यास होते. केळी वेफर्स विक्री करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. शनिवारी सायंकाळी त्यांनी घरात कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पत्नी घरी आली. तेव्हा त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसून येताच त्यांनी आक्रोश केला. नंतर नातेवाईकांच्या मदतीने भगवान महाजन यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अद्याप आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.