जीएमसीत वेटींग वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:45+5:302021-04-17T04:14:45+5:30
रस्त्याच्या मधोमध खड्डा जळगाव : अजिंठा चौफुलीवर रस्त्याच्या मधाेमध एक भला मोठाखड्डा पडला आहे. मध्यंतरी त्याची डागडुजी करण्यात ...
रस्त्याच्या मधोमध खड्डा
जळगाव : अजिंठा चौफुलीवर रस्त्याच्या मधाेमध एक भला मोठाखड्डा पडला आहे. मध्यंतरी त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, काहीच दिवसात स्थिती जैसे थे झाली आहे. हा खड्डा मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरू शकतो, त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी समोर येत आहे.
इंजेक्शनसाठी धावा धाव
जळगाव : रेमडेसिविरच नव्हे तर टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर होत आहे. शासकीय यंत्रणेत या इंजेक्शनचा वापर होत नसला तरी खासगी रुग्णालयांकडून ते रुग्णांना लिहून दिले जात आहे. या इंजेक्शनचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने वापर केल्यास ते प्रभावी ठरते, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, सर्वांवरच त्याचा फरक पडेल असेही नाही, असेही काही तज्ञ सांगतात.