ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी वेटींग कायम...लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:43+5:302021-04-17T04:14:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची त्यातच ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच ...

Waiting for oxygen, remedivir ... Vaccination started | ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी वेटींग कायम...लसीकरण सुरू

ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी वेटींग कायम...लसीकरण सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची त्यातच ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला असून त्या ठिकाणचे रुग्ण जळगावात हलविले जात आहे. अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविरचा तुटवडा कायमच असून रोज नातेवाईकांची फिरफिर सुरूच आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत १५०७ रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असून ७७४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहे. ही संख्या कमी असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ही संख्या वाढल्याने ही मागणी प्रचंड वाढली असून त्या मानाने पुरवठा मात्र कमी होत आहे. गंभीर रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागणी ५० टन, येतेय ३० टन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिवसाला ८ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची गरज पडत आहे. पूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास ५० टन ऑक्सिजनची गरज असताना पुरवठा मात्र ३० मेट्रीक टन होत आहे. दुसऱ्या दिवशी सिलिंडर आले नाही तर मोठी गंभीर परिस्थिती निमार्ण होण्याची शक्यता असते. अशा आणिबाणीच्या स्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांना थेट जळगावात पाठविण्यात येत आहे.

पुढे काय : डुयरा सिलिंडरचा उपयोग प्रशासनाकडून केला जात आहे. शिवाय खासगी रुग्णालयांनी आवश्यकतेपेक्षा अधिक वापर कर नये, शिवाय अशा रुग्णालयांना नोटीस देऊन खुलासे मागविण्यात येत आहे. नुकतीच पालकमंत्र्यांनी एक बैठक घेऊन याबाबत वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्यासंदभार्त चर्चा करण्यात आली होती.

रेमडेसिविरचा केवळ दहा टक्के पुरवठा

गेल्या महिनाभरापासून रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आता तर शासकीय यंत्रणेतही हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र आहे. रोजची मागणी ५ हजार इंजेक्शनची असून ५०० इंजेक्शनपर्यंत कधी कधी प्राप्त होत आहे. त्यमाुळे इंजेक्शनसाठीची धावपळ थांबलेली नाही.

पुढे काय : निकषात बसत असेल तरच याचा वापर रुग्णांवर करावा , असे आवाहन प्रशासनाकडून वांरवार करण्यात आले आहे. जे रुग्णालय याचा सरार्स वापर करीत आहे. त्या रुग्णालयांना नोटीस दिली जात आहे. याचा सर्रास वापर थांबविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. शिवाय सुरटसुटीत वाटप करण्यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

लसीकरण आठवड्यानंतर सुरळीत

जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे डोस संपल्यामुळे जवळपास सर्वच केंद्र बंद होती. काहीच केंद्रावर थोड्याफार प्रमाणात लसीकरण सुरू होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपूर्वी लसीचे ४० हजार डोस उपलब्ध झाल्यानंतर आता जवळपास सर्व केंद्रावर लसीकरण सुरळीत सुरू असून यात गुरुवारी दिवसभरात ८ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पहिला तर २ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला.

पुढे काय : ४५ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्याला मोठा साठा लागणार असून त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा लागणार आहे.

Web Title: Waiting for oxygen, remedivir ... Vaccination started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.