ठळक मुद्देदहा दिवसापूर्वी घेतले विष एका पायाने अपंग होता तरुण पत्नीचा रुग्णालयात आक्रोश
आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : वाकोद, ता.जामनेर येथील कैलास बाबुराव पांढरे (वय ३४) या तरुणाचा सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. कैलास याने ४ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते. त्यादिवसापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. कैलास हा अपंग होता व टेलर काम करायचा. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे. कैलासचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने प्रचंड आक्रोश केला. अन्य नातेवाईकांनी त्यांना धीर दिला.