म्युनिसिपल हायस्कूलची भिंत पडक्या स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:38+5:302021-06-09T04:21:38+5:30
आता नगरपालिकेला ही भिंत पाडून घ्यावी अशी नोटीस कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नोटीस दिल्यानंतरच जीर्ण ...
आता नगरपालिकेला ही भिंत पाडून घ्यावी अशी नोटीस कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नोटीस दिल्यानंतरच जीर्ण इमारती पाडल्या जातात. तसाच भाग या ठिकाणी वरच्या मजल्यावर निर्माण झाला आहे. समोरून पाहिल्यानंतर भिंतीचा खालचा भाग कोरला गेला असून विटांचे बांधकाम हे सुटून गेले आहे, मोठे बोगदे पडले आहेत. ही वीस ते तीस फुटांची भिंत केव्हा पडेल, हे सांगता येत नाही. मोठ्या स्वरूपात वादळ आले तर वादळात ही भिंत पडू शकते आणि मोठा अनर्थ घडू शकतो.
हा अनर्थ घडण्यापूर्वीच ही भिंत एकतर दुरुस्त करणे गरजेचे आहे किंवा या भिंतीला पाडून नवीन भिंत बांधणे आवश्यक आहे, अन्यथा ही भिंत पावसाळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. मुख्याध्यापक हे शाळेत फिरणाऱ्या व व्यायाम करणाऱ्या लोकांना तिकडे जाऊ नका. भिंत पडू शकते, अशा सूचना देतात. मात्र ही भिंत दुरुस्त करणे किंवा नगरपालिकेतील शिक्षण सभापती किंवा मुख्याधिकारी यांच्याकडे ही भिंत पडक्या स्थितीत आहे, असे कळविणे भाग असताना दुर्लक्ष का करीत आहेत? असा सवाल केला जात आहे.
===Photopath===
080621\08jal_9_08062021_12.jpg
===Caption===
मुन्सिपल हायस्कूलची भिंत पडक्या स्थितीत