शाहू नगरातील रस्त्यांची दुरवस्था
जळगाव : गोविंदा रिक्षा थांब्याकडून शाहू नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहन धारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर वाहन धारकांचे अधीकच हाल होत आहेत. त्यामुळे मनाला प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महावितरणतर्फे पावसाळी पूर्व कामे सुरू
जळगाव : महावितरणतर्फे दरवर्षा प्रमाणे यंदाही नुकतीच पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध भागातील विद्युत तारांवर लोंबकळलेल्या फांद्या, वाकलेले खांब, विद्युत तारा आदी कामे दुरुस्ती करण्यात येत आहेत. या कामासाठी काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित करण्यात येत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
तिकिट वेडिंग मशीन बंद
जळगाव : रेल्वे स्टेशनवर दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले तिकीट वेडिंग मशीन कोरोना मुळे यंदा बंद ठेवण्यात आले आहेत.या मशीनमुळे प्रवाशांना तात्काळ प्लँटफार्म तिकीट काढता येत होते. मात्र, कोरोनामुळे हे मशीन बंद असल्यामुळे आता तिकीट खिडकीतून रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत आहे.