‘आजी, तुम्ही लवकरच बऱ्या होत आहात’, असे सांगून डाॅक्टर धीर देत हाेते. बघता बघता ५४ व ३० ऑक्सिजन लेव्हल असलेला रुग्ण एकही रेमडेसिविर डोस न घेता अवघ्या १२ दिवसांत बरा झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. मालताबाई भिल्ल या ६२ वर्षीय महिलेने कोरोनावर मात करीत तब्येत ठणठणीत होऊन घर गाठले आहे.
मधुमेह असलेल्या मालतीबाई काळू भिल्ल या महिलेने सकारात्मक विचार व आत्मविश्वासाने कोरोनावर यशस्वी विजय मिळवला आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना बरे करून डिस्चार्ज दिला.
सावदे येथील मालतीबाई भिल्ल यांची कोरोनाने प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ५४ व ३० झाली होती. स्कोअरही २४ होता. मधुमेह असलेल्या या रुग्णावर खबरदारी, नियमित सजग राहून उपचार करण्यात आले. त्याला रुग्णाने चांगला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्या बऱ्या झाल्या आहेत. १२ दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
- डॉ. पंकज जाधव, वैद्यकीय अधिकारी, भडगाव
===Photopath===
290521\29jal_3_29052021_12.jpg
===Caption===
मालतीबाई भिल्ल बाजूला डाॅ. पंकज जाधव यांच्यासह आरोग्य विभागाची टीम.