विनायक वाडेकर ।मुक्ताईनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च महिन्यापासूनच लागलेल्या लॉकडाऊनमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मंडप व्यवसायाला अक्षरश: घरघर लागली आहे. पाच ते सात कोटी रुपयांपर्यंत होणारा व्यवहार यावर्षी झालाच नाही. त्यामुळे मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.२२ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विविध व्यवसायिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. त्यामध्ये मंडप व्यवसायाचेदेखील फार मोठे नुकसान झाले आहे.दरवर्षी मार्च एप्रिल मे व जून महिन्याच्या २० तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात विवाह होतात. विशेष म्हणजे तालुक्यातील ७९ गावांमध्ये किमान ३०० ते ४०० लग्नसमारंभ दरवर्षी होतात. त्यामुळे विविध व्यवसायांसोबतच मंडप व्यवसायाचीही चलती असते. पूर्ण वर्षभराचा व्यवहार फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत मंडप व्यवसायांचा पूर्ण होतो. २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाल्यापासून विवाह समारंभ नियमानुसार बंदी आणण्यात आली. मे महिन्याच्या मध्यंतरी ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडतील, अशी नियमावली नवीन नियमानुसार करण्यात आली. या नियमांमुळे मात्र अक्षरश: विवाह सोहळा बंद पडले. सुरुवातीच्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात एकही लग्न समारंभ झाला नाही. जे लग्न झाले ते अतिशय कौटुंबिक वातावरणात शेतात किंवा एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये ठराविक आठ ते दहा लोकांच्या उपस्थितीत विवाहसमारंभ झाले. मे महिन्याच्या मध्यापासून तिसऱ्या लॉकडाऊननंतर लग्नसमारंभासाठी ५० जणांची परवानगी देण्यात आले आणि विशेष म्हणजे यावर्षी दिवाळीनंतर १८ तारखेपासूनच विवाह तिथी सुरू झालेल्या होत्या. याचा विपरित परिणाम मात्र मंडप व्यवसायावर फार मोठा पडला. मुक्ताईनगर तालुक्यात जवळपास ७० मोठे मंडप व्यावसायिक तर दीडशेच्या आसपास लहान व्यावसायिक हे मंडप व्यवसाय करतात.मंडप व्यवसायामध्ये स्टेज, डेकोरेशन, साध्या पट्ट्या, रंगीत पट्ट्या, त्याचसोबत गेट, अत्तरदाणी, गाद्या यासारख्या विविध सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यावर्षी मात्र एकही मोठा लग्न सोहळा न झाल्याने अक्षरश: या व्यावसायिकांची घरघर लागली. दरवर्षी एक व्यवसायिक किमान सात ते दहा लाख रुपयांचा व्यवहार केवळ या तीन महिन्यात करत असतो. मात्र यावर्षी अतिशय किरकोळ प्रमाणात लग्न समारंभ तेही ४०-५० वºहाडींंच्या उपस्थितीत झाल्याने केवळ एक किंवा दोन पट्टीवर आणि विना स्टेजचे लग्न लागले. त्यामुळे मंडप व्यावसायिक ज्या लग्नसमारंभासाठी किमान ८० हजार व एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार करत होते तो व्यवहार केवळ दोन ते पाच हजार रुपयांच्या आत येऊन ठेपला. यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील जवळपास दीडशे मंडप व्यावसायिकांचे किमान सात ते आठ कोटी रुपयांचे एका वर्षाचे नुकसान झाले आहे.मंडप व्यावसायिक म्हणतात...यावर्षी मी लग्न समारंभासाठी १५ लाख रुपये खर्च करून स्टेज व नवीन साहित्य घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे विवाह समारंभच न होत नाहीत. सर्व पैसा अंगावर पडला आहे व उपासमारीची वेळ आली आहे.-चंद्रकांत माळी, रा.पिंपरी अकाराउतदरवर्षी तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण वर्षभराचा आमचा व्यवहार होतो. मजुरांचे पगार तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यावर सुटतो. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे कोणताही व्यवसाय झाला नाही. परिणामी आमच्यावर दुर्दैवी प्रसंग आला आहे. मंडप व्यावसायिकांसाठी शासनाने काही तरी आर्थिक मदत करावी. -गणेश कपल, रा.मुक्ताईनगरएक वर्षाचा व्यवहार हा केवळ तीन महिन्यांत होतो. मात्र यावर्षी संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने आर्थिक गणिते बिघडली असून, यापूर्वी घेतलेली कर्जे फेडणेदेखील मुश्कील झाले आहे. शासनाने मंडप व्यावसायिकांना मदत केली पाहिजे.-विजय दवंगे, रा.अंतुर्ली
मंडप व्यवसायाला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 7:37 PM
लॉकडाऊनमुळे मंडप व्यवसायाला घरघर लागली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे.
ठळक मुद्देकोरोना इफेक्टलॉकडाऊनमुळे लग्नसराई बंदचा फटका सरकारकडून मदतीची अपेक्षा