...तर राजू शेट्टींच्या आंदोलनात आमचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:31 PM2018-07-15T17:31:57+5:302018-07-15T17:32:21+5:30

प्रमोद पाटील : सरकारने दूध उत्पादकांचा अंत पाहू नये

... while our participation in the Raju Shetti agitation | ...तर राजू शेट्टींच्या आंदोलनात आमचाही सहभाग

...तर राजू शेट्टींच्या आंदोलनात आमचाही सहभाग

Next


चाळीसगाव, जि.जळगाव : दूध भुकटीचे दर पडल्याने दूधाचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून पडले असून, सरकारने दूध भुकटीसाठी अनुदान देण्याबाबत सकारात्मकता दाखवली पाहिजे. दूध उत्पादक आणि पशुपालक अडचणीत असल्याने सरकारने मागणीचा विचार करावा, अन्यथा खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी दिला आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी दूध भुकटीसाठी अनुदान किंवा कर्नाटक सरकारप्रमाणे दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये थेट अनुदान देण्याची मागणी करताना आंदोलनाचे हत्यार उपासण्याचे बिगूल वाजविले आहे; याला प्रमोद पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा दूध संघ या समस्येला सामोरा जात आहे. दूध भुकटीचे दर वाढत नसल्याने दुधाचे खरेदी दर कमी करण्याचा कडू निर्णय आम्हाला घ्यावा लागला. दूधाच्या अर्थकारण भुकटीला अनुदान दिल्याशिवाय ताळ्यावर होऊ शकत नाही.
वैरण, वैद्यकीय उपचार यांचे दर वाढल्याने दुध उत्पादकांची परवड वाढली आहे. एक लीटर बिसलरीचे पाणी आणि दूधाची किंमत सारखीच झाली असून, या अरिष्टामुळे दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने दूध उत्पादकांसाठी तारणहार भूमिका घ्यावी.
याबाबत सरकारने चालढकल केल्यास जाहीरपणे राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होऊन जळगाव जिल्हा ढवळून काढू, असेही पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Web Title: ... while our participation in the Raju Shetti agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.