शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्याचे कवित्व अजूनही सुरू आहे. ते त्यांनी केलेल्या भाषणामुळे. मुक्ताईनगर मतदार संघात गेल्या निवडणुकीत झालेल्या बदलाप्रमाणेच येत्या निवडणुकीत जामनेरमध्येही परिवर्तन घडवा... असे आवाहन त्यांनी केले. यानिमित्ताने भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मध्येच कुणी समर्थक आपले खरे आहे... असे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. आता यापुढची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे जामनेरची जागा शिवसेना मागणार नाही ना... यावर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
मुक्ताईनगरमधील शिवसेना उमेदवार कुणाच्या बळावर निवडून आले याची माहिती घ्या, असे खुले आव्हान सोशल मीडियातून दिले जात असल्याने वेगळ्याच चर्चेला सुरुवात होत आहे.