शरद बन्सी ।धरणगाव, जि.जळगाव : तब्बल एका तपापासून पंचक्रोशीतील विधवा, परितक्ता तसेच गरीब-मागासवर्गीय महिलांना शासनाच्या उपक्रमांतर्गत स्वयंरोजगाराचे धडे देवून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देणाऱ्या धरणगावच्या पौर्णिमा समीर भाटिया या महिलांसाठी धडपडणाºया, ‘रोजगार रागिणी’ म्हणून नावारुपाला आल्या.पाच हजारावर जास्त महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिल्यामुळे अनेक विधवा, परितक्ता महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. यातून अनेक महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे.विविध प्र्रकारचे प्रशिक्षणजिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गतआपल्या दर्शन ट्रेनिंग इंस्टिट्यूटमार्फत विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना शिवणकाम, ब्यूटीपार्लर, कुकींग, कागदी पिशव्या बनविणे, तोरण बनविणे, प्लॅस्टीकचे हार, माळा तयार करणे आदींचे शासनामार्फत प्रशिक्षण देण्याचे व त्यांना स्वयंरोजगारास प्रेरणा देण्याचे काम परितक्ता या गेल्या १० वर्षांपासून करीत आहेत. त्यांनी आजपावेतो पाच हजारावर विधवा, परितक्ता, गरीब मागासवर्गीय महिला, युवतींना प्रशिक्षण दिले आहे. यापैकी अनेक महिला आपल्या पायावर उभ्या राहून व्यवसाय व उद्योग करताना दिसत आहे. त्यांना या कामाची प्रेरणा सासरे स्व.सुभाष भाटिया, सासू सीमाताई भाटिया, पती समीर भाटिया यांच्याकडून मिळाली आहे.फुलमाळा, तोरण व हार उद्योग प्रसिद्धपौर्णिमा भाटिया यांनी स्वत: लघुउद्योग अंतर्गत प्लॅस्टीक फुलमाळा तयार करणे, तोरण तयार करणे, फोटो हार बनविणे व हा माल राज्यभर पुरवठा करणे हा व्यवसाय सुरू केला असून, यासाठी ३० महिला त्यांच्याकडे काम करीत आहेत.अधिकारी लोकप्रतिनिधीकडून गौरवअनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरणा ठरलेल्या या महिलेच्या कार्याची दखल घेत तत्कालिन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, प्रकाश शाब्दे , रुबल अग्रवाल आदींनी वेळोवेळी कौतुक केले आहे.
विधवा, परितक्त्यांसाठी त्या ठरताहेत ‘रोजगार रागिणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:36 AM
एका तपापासून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देवून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देणाऱ्या पौर्णिमा भाटिया या महिलांसाठी ‘रोजगार रागिणी’ म्हणून नावारुपाला आल्या.
ठळक मुद्देमहिला दिन विशेषपाच हजारावर महिलांना स्वयंपूर्ण केलेअनेक महिलांनी उभारला स्वत:चा रोजगार