रत्नापिंप्री सरपंचपदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:02 PM2021-02-12T17:02:41+5:302021-02-12T17:03:38+5:30
रत्नापिंप्री सरपंचपदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी निवडून आली आहे.
रत्नापिंप्री, ता.पारोळा : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी सुनीता ज्ञानेश्वर पाटील, तर उपसरपंचपदी अंकुश भागवत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यामध्ये ऐकावे ते नवलच अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य ग्रामपंचायतीच्या कामासाठी वाहून घेतले, दगडाला देव पावतो या उक्तीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील त्यांच्या पत्नीला निवडणुकीत उमेदवारी करण्यास सांगितले व जनता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली व केवळ तीन मतांनी निवडणुकीत विजयी झाल्या शेवटी. नशीब बलवत्तर जनरल महिला आरक्षण निघाल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली. सुनीता ज्ञानेश्वर पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी अंकुश ज्ञानेश्वर भागवत यांचाही एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक दीपक भोसले, सर्कल शांताराम पाटील, तलाठी वाघमारे, पोलीस पाटील तसेच नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.