नगरसेवकांची बांधिलकी जनतेशी राहणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:04+5:302021-06-09T04:19:04+5:30
वार्तापत्र महापालिकेत अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 27 नगरसेवकांनी ...
वार्तापत्र
महापालिकेत अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 27 नगरसेवकांनी विकासाचं नाव सांगून पक्षांतर करत थेट शिवसेनेला मदत करत, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणली. महापालिकेच्या निवडणुकीत देखील अनेक नगरसेवकांनी याच विकासाचे नाव सांगत इतर पक्षांना मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र अडीच वर्षात भाजप मध्ये राहून कोणत्याही नगरसेवकाला आपल्या प्रभागाचा व शहराच्या देखील साधा विकास देखील करता आला नाही. अडीच वर्षात केवळ नागरिकांचा संतापाचा सामना सर्वपक्षीय नगरसेवकांना करावा लागला. एन् महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम लावून नगरसेवकांनी जनतेला पुन्हा विकासाचे आश्वासन देत पक्षांतर केले. जळगावकरांनी भाजपने दिलेल्या अडीच वर्षातील आश्वासनांची आठवण काढत नगरसेवकांच्या पक्षांतराला देखील एक प्रकारे समर्थनच दिले. आता जळगावकरांना पक्षांतर केलेल्या नगरसेवकानी ज्या कारणाने पक्ष बदल केला आहे. त्या कारणाची पूर्तता होण्याची अपेक्षा आता जळगावकर लावून आहेत. नगरसेवक जनतेच्या बांधिलकी साठीच व विकासासाठीच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत हे आता नगरसेवकांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे. जर पुढील अडीच वर्षात शहराचा समस्या कायम राहील्यात तर जनतेची बांधीलकी कोणत्याही लोकप्रतिनिधी सोबत राहील याची देखील शास्वती जनता देणार नाही. भाजपने महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस केवड विजयासाठी इतर पक्षातील नगरसेवक आपल्या बाजूने करत ही निवडणूक जिंकली. तेव्हाही जनतेने या पक्षांतराच्या पाठिंबाच दिला होता, भाजपने भ्रमनिरास केल्यानंतर आत्ताही शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता आणण्याचा या प्रकाराला देखील जनतेने पाठिंबा दिला आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की निवडून येणारे नगरसेवक जनतेला गृहीत धरणार नाही. जर जळगावकरांना गृहीत न धरताच, केवळ जळगावकरांना विकासाचे गाजर देऊन स्वतःच्या विकास करण्याचा हा खटाटोप नगरसेवकांकडून होत असेल तर जळगावकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या व सत्तेच्या बाजार मांडणाऱ्याना मतदानातून उत्तर देईल च, त्यामुळे जनतेशी बांधिलकी ठेवून व शहराचा विकास करून च पुढील निवडणुकीसाठी नगरसेवकांनी प्रयत्न केल्यास, त्या प्रयत्नांना जळगावकर नेहमी समर्थन देत राहतील.