लाखो रुपयांचा ऐवज असलेली बॅग काही तासातच पोलिसांनी शोधली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:21+5:302021-01-18T04:15:21+5:30

बसमध्ये झाली गहाळ : प्रवाशाला सुखद धक्का जळगाव: बसमध्ये प्रवास करतांना सात तोळे सोने, लॅपटॉप व रोख रक्कम ...

Within hours, police found a bag containing millions of rupees | लाखो रुपयांचा ऐवज असलेली बॅग काही तासातच पोलिसांनी शोधली

लाखो रुपयांचा ऐवज असलेली बॅग काही तासातच पोलिसांनी शोधली

Next

बसमध्ये झाली गहाळ : प्रवाशाला सुखद धक्का

जळगाव: बसमध्ये प्रवास करतांना सात तोळे सोने, लॅपटॉप व रोख रक्कम असलेली गहाळ झालेली बॅग रामानंद नगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच शोधून प्रवाशाला सुखद धक्का दिला. रविवारी सकाळी ही घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन सुरेश पाटील हे पारोळा येथील रहिवासी एका कंपनीत नोकरीला आहेत. रविवारी खामगाव येथून पारोळा बसने प्रवास करत होते. जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे त्यांना त्यांची बॅग दिसली नाही. यानंतर ते बसमधून उतरून तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलीस स्टेशनला आले. याचवेळी दादावाडी स्टॉप येथून एकाचा फोन आला. त्याने तुमची बॅग माझ्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनचे रवींद्र पाटील, शिवाजी धुमाळ, विजय खैरे , रवींद्र चौधरी, उमेश पवार यांनी संबंधितांनी फोनवर बोलणाऱ्या संबंधिताचा शोध घेतला. काही तासातच दादावाडी गाठले व चेतन पाटील यांची बॅग मिळविली. बॅगेत सात तोळे सोने, लॅपटॉप तसेच १३०० रुपये रोख असा ऐवज सुखरुप होता. बसमध्ये बॅग अदलाबदल झाली होती. बसमध्ये जळगाव येथील शिवदास चक्रवती यांच्याकडे ही बॅग होती. एक सारख्याच दिसणाऱ्या बॅगांमुळे घोळ झाला. चक्रवती यांची बॅग बसस्थानकात राहिली होती. व त्यांनी आपली समजून चेतन पाटील यांची बॅग घेतली होती असे निष्पन्न झाले. तक्रार देण्यास आलेल्या चेतन पाटील यांना त्यांची बॅग परत करण्यात आली. सात तोळे दागिने व इतर ऐवज असलेली बॅग सुखरुप मिळाल्याने चेतन पाटील यांनी रामानंदनगर पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Within hours, police found a bag containing millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.