एरंडोल, जि.जळगाव : जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम बुधवार दरवाजा श्रीराम चौक परिसरात झाला. यात विशेष प्रावीण्य प्राप्त महिला व मुलींचा सत्कार करण्यात आला.यात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्यसेविका शोभा पाटील, पीएच.डी. मिळाल्याबद्दल स्वाती अमित पाटील, राज्यस्तरीय कुस्तीपटू योगेश्वरी मराठे, बालरोगतज्ज्ञ कुंजल राजेश महाजन, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्योती भागवत, एम.फॉर्म पदवीप्राप्त तेजास्विनी महाजन, बास्केटबॉलपटू कविता महाजन, राज्यस्तरीय कबड्डीपटू नंदिनी महाजन, याशिवाय साक्षी पाटील, राजेश्वरी गुजर, योगेश्वरी पाटील, प्रतिभा महाजन, प्रांजल ठाकूर, उर्वशी महाजन अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिला व मुलींचा सत्कार करण्यात आला..या वेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, नगरसेविका छाया दाभाडे, डॉ.गीतांजली ठाकूर, डॉ.आसावरी पाटील, डॉ.स्नेहल पाटील, आरती ठाकूर, सुरेखा पाटील तसेच नगरसेविका सरलाबाई पाटील, वर्षा शिंदे, प्रतिभा पाटील, हर्षाली महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जया राजेश महाजन व प्राची पाटील, सूत्रसंचालन अंकिता पाटील व साक्षी पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी परिसरातील महिला व अनुलोम, एरंडोल यांचे सहकार्य लाभले.
एरंडोल येथे महिलांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:42 PM