पारोळा तालुक्यात बारापैकी ११ ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभारी ‘महिला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 06:48 PM2021-02-12T18:48:39+5:302021-02-12T18:49:00+5:30
बारापैकी ११ ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभारी ‘महिला’ आहेत.
पारोळा : तालुक्यात पहिल्या टप्प्यात १२ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत बारापैकी ११ ठिकाणी ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्यात आला. यात बारापैकी नऊ ठिकाणी बिनविरोध तर तीन ठिकाणी निवडणूक घेण्यात आली.
शेळावे बुद्रूक, शेवगे बुद्रूक व सांगवी या तीन ठिकाणी सरपंच पदासाठी निवड घेण्यात आली तर उर्वरित सर्व सरपंच बिनविरोध निवडून आले. यात ग्रामपंचायतनिहाय सरपंच व उपसरपंच असे-
करमाड बुद्रूक सरपंच-वैशाली सुशील पाटील, उपसरपंच वर्षा भाईदास पाटील, शेळावे बुद्रूक-रुपाली अमोल पाटील (सरपंच), अयुब छगन पाटील (उपसरपंच), जोगलखेडे- सुनंदा भरत पाटील (सरपंच), सुनीता संदीप पाटील (उपसरपंच), शिरसमणी- सरपंच -रोहिदास भिका पाटील ,उपसरपंच नीलिमा योगेश पाटील, पिंप्री प्र.उ. -सरपंच ज्योत्स्ना सुनील पगारे, उपसरपंच-पुष्पा रामकृष्ण पाटील, बोळे- सरपंच-विमलबाई राजेंद्र गिरासे ,उपसरपंच नगुबाई रतन भिल, सांगवी- सरपंच वैशाली प्रवीण पाटील, उपसरपंच- आनंदा रविंद्र पाटील पळासखेडेसीम सरपंच सीमा विनोद पाटील, उपसरपंच- अनिता भारत पाटील, दळवेल -सरपंच मनीषा प्रवीण पाटील, उपसरपंच विठ्ठल सुकदेव पाटील, रत्नापिंप्री- सरपंच- सुनीता ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच- अंकुश ज्ञानेश्वर भागवत, शेवगे बुद्रूक- सरपंच -भिकूबाई अरविंद देशमुख, उपसरपंच- उषाबाई रवींद्र पाटील, टोळी-सरपंच- मनीषा राजेंद्र पाटील, उपसरपंच बापूराव भटा पाटील यांची निवड झाली.