पारोळा : तालुक्यात पहिल्या टप्प्यात १२ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत बारापैकी ११ ठिकाणी ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्यात आला. यात बारापैकी नऊ ठिकाणी बिनविरोध तर तीन ठिकाणी निवडणूक घेण्यात आली.शेळावे बुद्रूक, शेवगे बुद्रूक व सांगवी या तीन ठिकाणी सरपंच पदासाठी निवड घेण्यात आली तर उर्वरित सर्व सरपंच बिनविरोध निवडून आले. यात ग्रामपंचायतनिहाय सरपंच व उपसरपंच असे- करमाड बुद्रूक सरपंच-वैशाली सुशील पाटील, उपसरपंच वर्षा भाईदास पाटील, शेळावे बुद्रूक-रुपाली अमोल पाटील (सरपंच), अयुब छगन पाटील (उपसरपंच), जोगलखेडे- सुनंदा भरत पाटील (सरपंच), सुनीता संदीप पाटील (उपसरपंच), शिरसमणी- सरपंच -रोहिदास भिका पाटील ,उपसरपंच नीलिमा योगेश पाटील, पिंप्री प्र.उ. -सरपंच ज्योत्स्ना सुनील पगारे, उपसरपंच-पुष्पा रामकृष्ण पाटील, बोळे- सरपंच-विमलबाई राजेंद्र गिरासे ,उपसरपंच नगुबाई रतन भिल, सांगवी- सरपंच वैशाली प्रवीण पाटील, उपसरपंच- आनंदा रविंद्र पाटील पळासखेडेसीम सरपंच सीमा विनोद पाटील, उपसरपंच- अनिता भारत पाटील, दळवेल -सरपंच मनीषा प्रवीण पाटील, उपसरपंच विठ्ठल सुकदेव पाटील, रत्नापिंप्री- सरपंच- सुनीता ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच- अंकुश ज्ञानेश्वर भागवत, शेवगे बुद्रूक- सरपंच -भिकूबाई अरविंद देशमुख, उपसरपंच- उषाबाई रवींद्र पाटील, टोळी-सरपंच- मनीषा राजेंद्र पाटील, उपसरपंच बापूराव भटा पाटील यांची निवड झाली.