CoronaVirus News: अमळनेरातून पळाले यमराज; नियोजन अन् लॉकडाऊनचा 'पॉझिटिव्ह' परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 08:29 PM2021-04-26T20:29:30+5:302021-04-27T10:19:47+5:30

नियोजन आणि लॉकडाउनचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

Yamaraj fled from Amalnera, | CoronaVirus News: अमळनेरातून पळाले यमराज; नियोजन अन् लॉकडाऊनचा 'पॉझिटिव्ह' परिणाम

CoronaVirus News: अमळनेरातून पळाले यमराज; नियोजन अन् लॉकडाऊनचा 'पॉझिटिव्ह' परिणाम

Next

- संजय पाटील
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अमळनेर तालुक्यात असलेल्या यमराजने आपला मुक्काम हलवला आहे. सोमवारी एकही मृत्यू कोरोनाने झाला नाही. 1506 पैकी फक्त 18 जण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्हीटीची टक्केवारी फक्त 1.2 पर्यंत घसरल्याने तालुक्याला सकारात्मक दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या अंशतः लॉकडाऊनच्या पालनासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनीदेखील नियोजनबद्ध कठोर पावले उचलून दररोज पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई आणि दुकाने सील केली जात होती. त्यामुळे लालची व्यापाऱ्यांना धडा मिळाला तर नागरिकांनीदेखील सावधानता बाळगली.

आरोग्य विभागातर्फे डॉ.प्रकाश ताळे , डॉ.गिरीश गोसावी, डॉ.विलास महाजन, डॉ.राजेंद्र शेलकर यांनी शिक्षक, अंगणवाडी सेविका , परिचारिका , आरोग्यसेवक यांचे पथक तैनात करून ट्रेसिंग , टेस्टिंग , ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर केल्याने रुग्णांचे होमकोरोंटाईन वाढले परिणामी 26 रोजी शहरात 907 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 14 जण तर ग्रामीण भागात 599 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी फक्त 4 जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हीटीची टक्केवारी 20 वरून 1.2 वर घसरली.

त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसात 276 जणांचा मृत्यू झाला होता दररोज कोविड रुग्णालयातून 6 ते 16 असे मृत्यू होत होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. योग्य नियोजन , वेळीच उपचार , सकारात्मक प्रेरणा यामुळे 26 रोजी 11 कोविड रुग्णालयातून आणि शहरातून देखील एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही त्यामुळे यमराज ने काढता पाय घेतल्याने दिलासा मिळाला आहे.

रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या घटली असली तरी बेफिकिरी करून चालणार नाही. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून रिकामे फिरणे बंद करावे. वेळीच उपचार करून घ्यावेत. -सीमा अहिरे, इंसिडन्ट कमांडर, अमळनेर

Web Title: Yamaraj fled from Amalnera,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.