धनाजी नाना महाविद्यालयात योग व प्राणायाम कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:32+5:302021-05-27T04:16:32+5:30
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील होते. ...
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील होते. उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. सतीश चौधरी आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या ऑनलाईन कार्यशाळेस १७९ जणांनी नोंदणी केली. प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश चौधरी यांनी केले. डॉ. गोविंद मारतळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिवाजी मगर यांनी आभार मानले.
कार्यशाळेस महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. योग व प्राणायाम यांचे महत्त्व, योग व प्राणायाम करताना श्वास प्रश्वास यांचे महत्त्व, कोणत्या व्यक्तीने कोणते आसन करू नये किंवा योग्य मार्गदर्शनाखाली करावे, याविषयी प्रात्यक्षिकासह सखाेल माहिती दिली. कार्यशाळेसंदर्भात गडचिरोली येथील प्रा. डॉ. राजू चावके आणि पश्चिम बंगाल येथून कार्यशाळेस उपस्थित राहिलेल्या प्रा. वैशाली घाटे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
----