साकेगाव सरपंचपदी योगिता कोळी, उपसरपंचपदी आनंद ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 02:37 PM2021-02-24T14:37:59+5:302021-02-24T14:38:20+5:30
साकेगाव सरपंचपदी योगिता कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव सरपंचपदी योगिता कोळी, तर उपसरपंचपदी माजी सरपंच आनंदा ठाकरे यांनी बिनविरोध निवड झाली. यात सरपंच मागासवर्गी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे १७ सदस्यीय ग्रा.पं.मध्ये २१ वर्षीय योगिता कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसपंचपदासाठी आनंदा ठाकरे व धनराज भोई यांचे अर्ज आले होते. मात्र सामंजस्यानंतर भोई यांनी मुदतीच अर्ज माघार घेतला. यामुळे ठाकरे यांचा उपसरपंचपदाचा मार्ग मोकळा होऊन त्यांची बिनविरोध निवड झाली.
सरपंच नवखे असले तरी उपसरपंच ठाकरे यांना ग्रा.पं. प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे सरपंच कोळी यांना ठाकरे यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.
दरम्यान, आमदार संजय सावकारे, भाजप शहराध्यक्ष परीक्षित बर्हाटे यांनी सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी एस. एम. इंगळे, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार, तलाठी राहुल वाघ, कोतवाल जितेंद्र चौधरी यांनी काम पाहिले, तर प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पोहेकर, विकास सातदिवे, संजीव मोरे, रशीद तडवी यांनी बंदोबस्त ठेवला.