स्पर्धेत टिकण्यासाठी मेहनत करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:18+5:302021-07-19T04:12:18+5:30
ते श्री शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी साईनाथ शांताराम अवचिते यास पाच हजारांची शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ...
ते श्री शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी साईनाथ शांताराम अवचिते यास पाच हजारांची शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन पाटील, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. बी. पाटील, आर. एस. पाटील उपस्थित होते.
यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगावमार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार समाज कल्याण विभागाकडून देण्यात येतो. सन २०२०-२१मध्ये श्री शिवाजी हायस्कूल या शाळेतून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून साईनाथ शांताराम अवचिते हा विद्यार्थी प्रथम आल्याने त्यास संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते पाच हजारांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक जी. बी. पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांस समाजकल्याण विभागाकडून पाच हजारांचा धनादेश प्रोत्साहनपर मिळत असतो. पी. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कौस्तुभ सोनवणे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी वाय. टी. पाटील, पी. आर. पाटील, जे. एच. भोई, संदीप बोरसे, प्रसाद नावरकर यांनी परिश्रम घेतले.
180721\18jal_5_18072021_12.jpg
पारोळा येथे विद्यार्थ्यांला चेक वाटप करताना डॉ सतीश पाटील, सोबत रोहन पाटील,जी. बी. पाटील, आर. एस. पाटील, पी. एन. पाटील.