पाचोरा - शेतातील नापिकी व किरकोळ कर्ज यामुळे जीवन जगणे असह्य झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन निंभोरा ता.सोयगाव येथील युवकाने स्वत:च्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पंकज साहेबराव बोरसे (वय २२) याने गुरुवार ११ रोजी सकाळी ८ च्या सुमारास स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई, वडील भोळसर स्वभावाचे, प्रपंचाची जबाबदारी स्वत:वर असल्याने व्यवहार करणे शक्य नाही. त्यातच स्वत:ची जमीन तीन एकर नापिकीमुळे व किरकोळ कर्ज फेड यामुळे पंकज त्रस्त होता. त्यातूनच त्याने जीवन संपवले अशी माहिती नातेवाइकांनी दिली. मयताच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ बहीण आहे. याप्रकरणी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणला. याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित करीत शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
निंभोरा येथील कर्जबाजारी युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:08 PM
निंभोरा ता.सोयगाव येथील युवकाने स्वत:च्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ठळक मुद्देशेतातील नापिकीमुळे झाले होते कर्जस्वत:च्या शेतात घेतला गळफासकर्ज फेडू न शकल्याने आले होते वैफल्य