पोलीस ठाण्यातच तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:44 PM2020-09-10T12:44:48+5:302020-09-10T12:44:54+5:30

जळगाव : एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या सागर दगडू रावते (२५, रा.अट्रावल, ता. यावल) या तरुणाने गुन्हा दाखल होण्याच्या ...

The youth tried to commit suicide at the police station | पोलीस ठाण्यातच तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस ठाण्यातच तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Next

जळगाव : एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या सागर दगडू रावते (२५, रा.अट्रावल, ता. यावल) या तरुणाने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने पोलीस निरीक्षकाच्या दालनातून बाहेर निघताच जंतूनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात घडली. सागर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील तरुण व तरुणी फैजपूर येथील महाविद्यालयात सोबत शिक्षण घेत होते. या काळात विविध शालेय कार्यक्रम, सहली व स्पर्धांच्या निमित्ताने सर्वच विद्यार्थी, विद्यार्थिनिंनी एकत्र फोटो काढलेले होते. तेथे या तरुण व तरुणीची ओळख झाली होती. आता या तरुणीचा जून महिन्यात विवाह झाला असून ती पती व सासरच्या मंडळीसह रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे.

लग्न झाल्याचे लागले जिव्हारी
दरम्यान, या तरुणीचे लग्न झाल्याने या तरुणाच्या जिव्हारी लागले. त्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीला काही दिवसापासून त्रास द्यायला सुरु केला आहे. तिला तसेच तिच्या पती व दिराला फोन करुन उलटसुलट माहिती देणे असे उद्योग सुरु केले. त्याच्यासोबत आणखी दोन तरुणही असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी शालेय जीवनातील फोटो तरुणीच्या पती व दिराला पाठविल्यानंतर या तरुणीच्या कुटुंबात वाद निर्माण झाला. अवघ्या तीन महिन्यापूर्वी सुरु झालेला संसार मोडण्याच्या मार्गावर आल्याने तरुणी व तिच्या पतीने बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

तक्रारीवरुन चौकशीला बोलावले
तरुणीने दिलेल्या तक्रार अर्जावरुन रामानंद नगर पोलिसांनी या तरुणाला बुधवारी तरुणाला चौकशीसाठी बोलावले होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी त्यांच्या दालनात या तरुणाची चौकशी केली. यावेळी तरुणीलाही बोलावण्यात आले होते. त्याच्यासोबत वडील व भाऊ असे आले होते. तरुणी तक्रार देण्यावर ठाम असल्याने हा तरुण हादरला. गुन्हा दाखल झाला तर जेलची हवा खावी लागेल, ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली, त्यामुळे बडगुजर यांच्या दालनाच्या बाहेर निघताच त्याने खिशातून जंतुनाशक औषधाची बाटली काढली आणि त्याच्यातील औषध प्राशन केले. यानंतर त्याला लगेच उलट्या होऊ लागल्या. बडगुजर यांनी त्याला तातडीने रुग्णालयात रवाना केले.

सोशल मीडियावर तरुणीचे अश्लिल फोटो व व्हिडीओ केले व्हायरल
या घटनेप्रकरणी पीडित तरुणीने सायंकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन सागर दगडू रावते व सुमीत पाटील (रा.अट्रावल, ता.यावल) या दोघांविरुध्द विनयभंग व आयटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला.तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सागर व सुमीत या दोघांनी तुझ्या नवºयाला समजू द्यायचे नसेल तर आम्ही सांगू तसे वाग असे फोन करुन धमकावले. त्यानंतर तरुणीचा पती व दिर यांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठविले व तसेच तिला तुझे पूर्वीचे किस्से आम्हाला माहिती आहेत, तिचे चारित्र्य चांगले नाही असा उल्लेख त्यात केला. त्याशिवाय युट्युबची लिंक पाठविली असता त्यात अश्लिल फोटो व व्हिडीओ होते. तरुणीचा संसार होऊ नये तसेच बदनामी होऊ या हेतूनेच त्याने हे व्हायरल केले. दरम्यान, तरुणीचा ई-मेल आयडीचाही गैरवापर करुन अश्लिल व्हीडीओ व फोटो व्हायरल केले. दरम्यान, पोलिसात तक्रार दिली पतीसह तरुणीला तलवारीने कापून टाकण्याची धमकी सागरने दिली.

संबंधित तरुण व त्याचा मित्र या दोघांविरुध्द विनयभंग व आयटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. सागरविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. संशयितांना लवकरच अटक केली जाईल.
-अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक

Web Title: The youth tried to commit suicide at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.