जि.प. व पं. स. सदस्यांची रत्नागिरी येथे कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:56+5:302021-06-23T04:12:56+5:30
यावल : रत्नागिरी येथे राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय ...
यावल : रत्नागिरी येथे राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. यात असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे सहभागी झाले होते. त्यात त्यांनी मार्गदर्शन केले.
निरुळ (रत्नागिरी) येथील उदय बने यांच्या फार्म हाऊसवर हा उपक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गौरे पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक उदय बने होते.
या कार्यशाळेसाठी राज्यातील भारत शिंदे, सुभाष पवार, रेखा कंटे, जयश्री सासे, असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, दत्ता साळुंके, संजय मडके, जय मंगल जाधव, औरंगाबाद विभागातून नितीन नकाते, सोलापूरचे रोहन बने, रत्नागिरी, कोल्हापूर व साताऱ्यासह राज्यातील असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच पंचायत समिती सदस्यांचे अधिकार सुरक्षित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी या दोन दिवसीय कार्यशाळा बैठकीत उपास्थित सर्व सदस्यांना आपण जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात केलेल्या विकास कार्याची विस्तृत माहिती व ग्रामीण पातळीवर या विकासकामांसाठी येणाऱ्या अडचणी व त्यावरील तोडगा कसा काढता येतो यासंदर्भात मार्गदर्शन केले.