जि.प.त गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:42+5:302021-03-16T04:17:42+5:30
डॉक्टरांकडे जबाबदाऱ्या जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड आणि नॉन कोविड अशी दोन स्वतंत्र यंत्रणा असल्याने याची जबाबदारी पुन्हा ...
डॉक्टरांकडे जबाबदाऱ्या
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड आणि नॉन कोविड अशी दोन स्वतंत्र यंत्रणा असल्याने याची जबाबदारी पुन्हा एकदा नव्याने वाटप करण्यात आली आहे. कोविडसाठी प्रमुख म्हणून औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, तर नॉन कोविडसाठी डॉ. विजय गायकवाड आणि डॉ. आस्था गनेरीवाल यांच्याकडे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
१३ नंबर कक्ष नॉन कोविड
जळगाव : जीएससीतील १३ क्रमांकाच्या कक्षात नॉन कोविड रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे. अत्यावश्यक स्थितीतील रुग्णांनाच या ठिकाणी दाखल करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात येत आहे. कोविड आणि नॉन कोविडचे नियोजनामुळे ही दक्षता घेतली जाणार आहे.
गर्दी वाढली
जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून शांत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी पुन्हा गर्दी पाहायवास मिळाली. नातेवाईक बाहेर बसलेले होते. वाहनांचीही वर्दळ वाढली होती, कोविड, नॉन कोविड अशी दोन यंत्रणा असल्याने हळूहळू गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.