धरणगाव - तालुक्यातील झुरखेडा येथील ग्रामपंचायतीमधील अपहारप्रकरणी १० ऑगस्ट रोजीपर्यंत जे कोणी दोषी आहेत. त्यांच्यावर
गुन्हा दाखल न केल्यास १५ ऑगस्ट रोजी प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी
दिला आहे. मध्ये १४व्या वित्त आयोगाच्या खात्यातून कोणतेही लिखित काम नसताना सरपंच, ग्रामसेवक यांच्या परस्पर सह्या करून, दोन लाख ७६ हजार वेगवेगळ्या दोन चेकने काढल्याच्या तक्रारीनंतर, ग्रामविकास खात्यातील अवर सचिव विजय चांदेकर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर, पंचायत समिती धरणगाव येथील विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली असता, ती रक्कम काढण्यात आली, अशी बँक स्टेटमेंट असून, ही बाब स्वतः ग्रामसेवकांनी पंचायत समिती धरणगाव येथील विस्तार अधिकारी यांच्यासमोर लिखित स्वरूपात मान्य केली आहे, तसेच चौकशीच्या दरम्यान ती रक्कम खात्यात भरलीही, पण पंचायत समिती धरणगाव येथील विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ज्या ज्या व्यक्ती या प्रकरणात दोषी आढळल्या आहेत, यांच्यावर कोणतीही कार्यवाही अथवा गुन्हा दाखल केला नाही, अशी तक्रार आहे, तसेच गावातील ग्रामपंचायतीमधील दप्तर देखील
गहाळ झाले आहे असे माहिती
अधिकारातून समोर आले असल्याचे
पाटील यांनी म्हटले आहे.