बायको सतत टोमणे मारते, अपमान करते याला त्रासून माल्कम अॅपलगेट (६२, रा. बर्मिंगहॅम) हे ब्रिटिश गृहस्थ घर सोडून दहा वर्षं जंगलात राहिले. एम्माऊस ग्रीनवीच ही धर्मादाय संस्था ज्या लोकांना सामाजिक उपक्रमांत काही उपयुक्त काम करायचं आहे व ज्यांना घराची गरज आहे अशांना घर उपलब्ध करून देते. या संस्थेचं संकेतस्थळ असून त्यावर माल्कम अॅपलगेट यांनी ब्लॉग लिहिला आहे.ते म्हणतात : मी बागेची देखरेख करण्याचे काम २५ वर्षं केलं व लग्न होईपर्यंत त्या कामाचा आनंदही लुटला. मी जितका जास्त वेळ काम करायचो, तेवढी माझी बायको संतापायची. मी घराबाहेर खूप वेळ असणं तिला अजिबात आवड नसे. माझ्यावर सतत नियंत्रण ठेवणारं तिचं वागणं हाताबाहेर जात राहिलं. मी कमी काम करावी, अशा धोशा तिनं लावला. त्यातून मार्ग काढायचा मी प्रयत्न केला. अखेर तिच्या वागण्याला कंटाळून मी कोणालाही न सांगता घर सोडून गेलो तेही तब्बल दहा वर्षं.ते लिहितात : मी किंग्स्टनजवळील जंगलात पाच वर्षं राहिलो. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या केंद्रात मी बागेची देखभाल केली. त्यांना एका मित्रानं सांगितल्यावर त्यांनी एम्माऊस ग्रीनवीचमध्ये राहण्यासाठी अर्ज केला. अॅपलगेट म्हणाले की, मी माझ्या नव्या घरी आनंदात असून मी नुकताच माझ्या बहिणीलाही भेटलो. गंमत म्हणजे आपला भाऊ केव्हाच वारला, असं तिला वाटत होतं.
बायकोच्या त्रासाने १0 वर्षं जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:42 AM