तिखट चिप्स खाऊन 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:04 PM2024-05-18T17:04:29+5:302024-05-18T17:04:52+5:30
एका 14 वर्षाच्या मुलाला सोशल मीडियावरील चिप्स खाण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं आहे. या मुलाने जास्त मसाले आणि तिखट असलेले चिप्स खाल्ले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज बघायला मिळतात. कधी खाण्याचे तर कधी पिण्याचे. आजकाल सगळीच लहान मुले चिप्स मोठ्या आवडीने खातात. लहान मुलांनी हट्ट केला तर आई-वडील घेऊनही देतात. पण एका 14 वर्षाच्या मुलाला सोशल मीडियावरील चिप्स खाण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं आहे. या मुलाने जास्त मसाले आणि तिखट असलेले चिप्स खाल्ले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारणही समोर आलं आहे. मुलाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही अनेक खुलासे झाले आहेत. असं समोर आलं की, चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात तिखट होतं आणि जन्मापासून तो हृदयरोगाने पीडित होता.
मुलाचं नाव हॅरिस वोलोबा होतं. ते अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये राहत होता आणि 10व्या वर्गात शिकत होता. एबीसीच्या रिपोर्टनुसार, मुलाचा मृत्यू 1 सप्टेंबर 2023 ला झाला होता. त्याने Paqui चिप्स खाल्ले होते. चिप्स तयार करणाऱ्या कंपनीने वन चिप्स चॅलेंज सुरू केलं होतं. ज्यात हॅरिसने भाग घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर कंपनीने स्पष्टीकरण जारी करून सांगितलं की, हॅरिसचा मृत्यू दु:खदायक आहे आणि परिवारासोबत आमच्या सद्भावना आहेत. हॅरिसच्या टेस्टनंतर समजलं की, हॅरिसचा मृत्यू 'उच्च कॅप्सायसिन कंसंट्रेशन असलेल्या फूड सब्सटांसच्या सेवनामुळे झाला'.
कॅप्सायसिन मिरचीला तिखट बनवतं. अशा स्थितीत शरीरातून रक्तस्त्राव होऊ शकतो. हृदयाची धडधड वाढते. मेडस्टार वॉशिंग्टन हॉस्पिटल सेंटरचे हृदय एक्सपर्ट डॉक्टर सैयद हैदर म्हणाले की, कॅप्सायसिनमुळे हृदयावर दबाव पडू शकतो. रिपोर्ट्समधून समजलं की, हृदयाच्या गंभीर स्थितीमुळे हॅरिस मिरचीमध्ये असलेल्या केमिकलच्या साइड इफेक्टबाबत संवेदनशील होता. आता या घटनेनंतर लोक तिखट चिप्स खाण्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.