कोट्यधीश होण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला चांगलंच माहीत असेलच. प्रत्येकालाच पैसा हवा असतो, श्रीमंत व्हायचं असतं. वर्षानुवर्षे मेहनत केली जाते, पण एखाद्याचंच नशीब चमकतं. एका रात्रीत अब्जाधीश होणं तसं अवघडच. पण Eric Tse बाबत असं नाही. एरिक हा एका चायनीज फार्मासी कंपनीच्या डिरेक्टरचा मुलगा आहे. एका रात्रीत २४ वर्षीय एरिक अब्जाधीश झाला आहे.
एरिकला त्याचे आई-वडील Cheung Ling Cheng आणि Tse Ping यांनी त्यांची कंपनी Sino Biopharmaceutical’s चे शेअर गिफ्ट म्हणून दिले आहेत. आणि एरिक रातोरात अब्जाधीश झालाय. इतकेच नाही तर तो आशियातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक झाला आहे. एरिकच्या वडिलांनी त्याच्या अकाऊंटमध्ये ३.८ बिलियन डॉलर इतकी रक्कम ट्रान्सफर केली.
(Image Credit : dailymail.co.uk)
त्यानुसार एरिक हा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत झाला आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची वैयक्तिक संपत्ती ३.१ बिलियन डॉलरच्या जवळपास आहे. अर्थातच त्याच्याकडे इतका पैसा आलाय. सोबतच अनेक जबाबदाऱ्याही आल्या असणार. एरिक आता कंपनीच्या एक्झिक्युटीव्ह बोर्डात डिरेक्टर झालाय.
एरिकचा जन्म सियाटल, वॉशिंग्टनमध्ये झाला असला तरी त्याचं शिक्षण बिजिंग आणि हॉंगकॉंगमध्ये झालंय. नुकतंच त्याने ग्रॅज्युएशन केलय. आता तो बिझनेसमध्ये आला असून जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्याचा समावेश झाला आहे.