70 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली 28 वर्षांची तरुणी; 'अशी' होती ऑनलाईन प्यारवाली लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 03:50 PM2023-08-06T15:50:25+5:302023-08-06T15:56:18+5:30
28 वर्षांच्या मुलीने तिची लव्हस्टोरी शेअर केली आहे. ती 42 वर्षांनी मोठ्या असलेल्या परदेशी व्यक्तीच्या प्रेमात पडली.
एका 28 वर्षांच्या मुलीने तिची लव्हस्टोरी शेअर केली आहे. ती 42 वर्षांनी मोठ्या असलेल्या परदेशी व्यक्तीच्या प्रेमात पडली. काही दिवस भेटल्यानंतर दोघेही डेटवर जाऊ लागले. नंतर त्याचे लग्नही झाले. मात्र, या नात्यामुळे तरुणीला खूप ट्रोल करण्यात आलं. लोक म्हणतात की, तिने पैशाच्या हव्यासापोटी एका 70 वर्षांच्या वृद्धाशी लग्न केलं. पण त्यांचं प्रेम खरं असून ते त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी असल्याचं या जोडप्याचे म्हणणं आहे.
28 वर्षीय जॅकी आणि 70 वर्षांच्या डेविडची ही गोष्ट आहे. 2016 मध्ये दोघेही एका डेटिंग साइटवर भेटले होते. येथूनच त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि मग भेटण्याची प्रक्रिया सुरू झाली. भेटीनंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन महिन्यांत डेविड जॅकीला भेटण्यासाठी अमेरिकेतून फिलिपाइन्सला पोहोचला. येथे दोघांनी बरेच दिवस एकत्र घालवले. त्यांच्यातील जवळीक वाढत होती.
दर दोन महिन्यांनी डेविड जॅकीला भेटायला फिलिपाइन्सला यायचा. अखेर 2018 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि जॅकी कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे शिफ्ट झाली. कोरोना लॉकडाऊन दरम्यान जॅकीने स्वतःचं टिकटॉक अकाऊंट तयार केलं आणि त्यावर तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करण्यास सुरुवात केली. तिच्या अकाऊंटवर 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. युजर्स तिच्या पोस्टवर विविध कमेंट करतात.
कपल नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करतं. डेविड म्हणाला- जर दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना आयुष्य एकत्र घालवायचे असेल तर वय फक्त एक संख्या आहे. लोकांनी टीका करू नये. आम्ही दोघे आनंदी आहोत. त्याचवेळी जॅकीने डेविडबद्दल सांगितले की, तो खूप साधा आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे. तो माझा आदर करतो आणि माझ्यावर त्याहून अधिक प्रेम करतो. त्याच्याशी लग्न केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.