पतीच्या मृत्यूनंतर 23 वर्षीय तरूणाच्या प्रेमात पडली 50 वर्षीय महिला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:51 AM2024-03-26T10:51:44+5:302024-03-26T10:52:26+5:30
मुलाचं वय 23 आहे तर त्याच्या गर्लफ्रेंडचं वय 50 आहे. दोघांमध्ये 27 वर्षांचं अंतर आहे.
रोज जगभरातून नातेसंबंधांबाबत वेगवेगळ्या अजब घटना ऐकायला-वाचायला मिळतात. यातील तर काही अशा घटना असतात ज्यावर सहज विश्वास बसत नाही किंवा हे लोक असं कसं करत असतील असाही प्रश्न पडतो. अशा घटना पाश्चिमात्या देशांमधून अधिक समोर येतात. अशाच एका कपलची एक कहाणी समोर आली आहे. मुलाचं वय 23 आहे तर त्याच्या गर्लफ्रेंडचं वय 50 आहे. दोघांमध्ये 27 वर्षांचं अंतर आहे. चेरी सलीनासचा मुलगा तिचा बॉयफ्रेंड मिक स्वेरिंगटनच्या वयाचा आहे.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारा मिकी म्हणाला की, मला लोकांचं अजिबात काही समजत नाही किंवा त्यांना काय म्हणू जेव्हा ते माझ्या गर्लफ्रेंडला माझी आई समजतात. लोकांकडे त्याला त्याचं रिलेशनशिप सिद्ध करावं लागतं.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ते म्हणाले की, 'त्यांना फक्त आनंदी रहायचं आहे आणि लोकांना त्यांच्याबाबत जे बोलायचंय ते त्यांनी बोलावं'. चेरीच्या पतीच्या निधनानंतर तिने पुन्हा लोकांना डेट करण्याचा विचार केला. एप्रिल 2023 ला ती टिंडरवर मिकीला भेटली. त्यांचं चांगलं पटलं. मिकी म्हणाला की, त्याला नेहमीच त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांचं आकर्षण होतं. नंतर दोघांनी त्यांच्या नात्याबाबत परिवारांना सांगितलं. पण मिकीची आई वयाच्या इतक्या अंतराने खूश नव्हती.
पण जेव्हा मिकीच्या आईने चेरीसोबत वेळ घालवला तेव्हा तिचे विचार बदललेल. आता दोघींमध्ये चांगली मैत्री झाली आहे. मिकी म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही अशा स्थितीत असता तेव्हा काही अडचणींचा सामना करावाच लागतो. पण लोक काय म्हणतात याचा तो विचार करत नाही. आम्हाला आनंद आहे की, आमच्यासोबत आमचा परिवार आहे. मी चेरला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा विचार केला ती किती सुंदर आहे आणि ती परफेक्ट आहे. तेच चेरीच्या परिवारानेही या नात्याला सपोर्ट केला. खासकरून तिच्या मुलाने.
चेरी म्हणाली की, 'माझ्या परिवारातील बरेच लोक मिकीला भेटलेले नाही. पण तरीही मला सपोर्ट करतता. ते आनंदी आहेत कारण मी आनंदी आहे. माझा मुलगा त्याला भेटला आहे. असं होणं एक चांगली बाब आहे'.
मिकीचं मत आहे की, 'वयात अंतर असलेल्या नात्यांबाबत लोकांच्या फार चुकीच्या धारणा आहेत. ते विचार करतात की, हे अजब आहे. पण मला अशा नात्यातून येणाऱ्या परिपक्वतेचा स्तर आवडतो. आमच्या जेव्हा सोशल मीडियावर टिका होते तेव्हा आम्ही त्यापासून दूर राहतो. आम्ही आनंदी आहोत'.