8 वर्षाच्या मुलानं गेम खेळून कमावले 24 लाख रुपये, तुम्ही काय कराताय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 07:30 PM2021-03-06T19:30:50+5:302021-03-06T19:32:11+5:30
अमेरिकेतील अशाच एका ८ वर्षांच्या मुलाने फक्त गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये कमावले, असे तुम्हाला कुणी सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही. पण हे खरं आहे. अमेरिकेतील एका ८ वर्षांच्या मुलान केवळ गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये जिंकले आहेत. कसे वाचा... (Gamer Joseph Deen)
वॉशिंग्टन - आपण आपल्या आसपास नेहमीच छोट्या मुलांना मोबाईल हाताळताना पाहतो. अनेकदा आपल्याला त्याचे आश्चर्यही वाटते. याशिवाय अनेक पालक आपल्या मुलांच्या २४ तास गेम खेळण्याच्या सवईमुळे त्रस्त झालेलेही आपण पाहतो. कारण त्यांच्या या सवईमुळे त्यांचे अभ्यासाकडे दूर्लक्ष होते. त्यांच्या शरिरावरही त्याचा परिणाम होतो. पण, अमेरिकेतील अशाच एका ८ वर्षांच्या मुलाने फक्त गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये कमावले, असे तुम्हाला कुणी सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही. पण हे खरं आहे. अमेरिकेतील एका ८ वर्षांच्या मुलान केवळ गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये जिंकले आहेत. (8 year Boy get 24 lakh rupees for playing Fortnite game in California America).
जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...
या मुलाचे नाव आहे, जोसेफ डीन (Joseph Deen), डीन अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहतो. फोर्टनाईट (Fortnite) हा प्रसिद्ध गेम खेळणारा तो जगातील सर्वात लहान मुलगा आहे. त्याला टीम 33 ने एक हायस्पीड कंम्प्युटर आणि 24 लाख रुपयांचा सायनिंग बोनसही दिला आहे.
4 वर्षांचा असल्यापासून खेळतो गेम -
ज्यापद्धतीने आपण निंजा आणि मारियो हे गेम लहानपणी खेळायचो. त्या प्रकारे जोसेफ केवळ 4 वर्षांचा असल्यापासून फोर्टनाईट गेम खेळतो. त्यामुळे गेम खेळण्यात तो अत्यंत तरबेज झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या आईवडिलांनाही त्याच्या गेम खेळण्याची तक्रार नाही.
रोज दोन तास खेळतो गेम -
त्याचे आई-वडिल सांगतात की जोसेफ शाळेतून आल्यानंतर रोज 2 तास गेम खेळतो. गेम खेळायला जाताना तो कायम आपल्या आई-वडिलांना विचारतो. सुट्टीच्या दिवशी तर तो अधिक वेळ गेमच खेळत असतो.
...तर नदीमध्ये बुडाली असती 'ही' चिमुकली, श्वानानं चलाकीनं वाचवला जीव; पाहा व्हिडिओ
मोठं होऊन गेमर होण्याची इच्छा -
जोसेफला मोठं होऊ डॉक्टर अथवा इंजिनियर होण्याची इच्छा नाही, तर त्याला प्रोफेशनल गेमर व्हायचे आहे. तो सांगतो, की जवर टीम 33 त्याच्याकडे आली नाही. तोवर त्याला कुणीही गांभीर्याने घेत नव्हते. जोसेफच्या पालकांनी त्याला मिळालेला 24 लाख रुपयांचा सायनिंग बोनस त्याच्या नावे सेव्हिंग खात्यात टाकला आहे. हे पैसे त्याच्या भविष्यासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.