या जाहिरातीवर जगभरातून होतेय टीका, Video पाहिला तर तुम्हीही चिडाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2016 07:52 AM2016-05-29T07:52:17+5:302016-05-29T07:52:17+5:30
चीनमध्ये तयार केलेल्या एका जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका होत आहे. या जाहिरातीचा व्हिडियोही सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत आहे. एका चीनी डिटर्जंट पावडरची ही ४८ सेकेंदांची जाहिरात आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पेइचिंग, दि. २९ : चीनमध्ये तयार केलेल्या एका जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका होत आहे. या जाहिरातीचा व्हिडियोही सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत आहे. एका चीनी डिटर्जंट पावडरची ही ४८ सेकेंदांची जाहिरात आहे. यामध्ये काळ्या गोऱ्यारंगावरुन वाद निर्माण झालेली आहे. जगभरातून या जाहीरातीवर टीका होत असताना चीनमध्ये मात्र या जाहीरातीचे स्वगत करण्यात आले आहे. चीनी लोकांना ही जाहीरात विशेष आवडल्याचे चित्र आहे.
काय आहे जाहिरातीमध्ये..
- वादात सापडलेली जाहिरात एका चीनी डिटर्जंट पावडरची आहे.
- या जाहिरातीत एका काळ्या रंगाच्या व्यक्तीला वॉशिंग मशीनमध्ये टाकले जाते.
- जेव्हा तो मशीनमधून बाहेर निघतो तेव्हा त्याचा रंग गोरा झालेला असतो.
- वर्णभेदावरुन या जाहिरातीवर टीका केली जात आहे.
- मात्र चीनमध्ये या जाहिरातीचे स्वागत करण्यात आले आहे.
- किऑबी नावाच्या डिटर्जंट उत्पादनाची ही जाहिरात आहे.