जर महागड्या लाकडाचा विषय निघाला तर कुणीही सर्वातआधी चंदनाचं नाव घेईल आणि त्यानंतर सागवानाचं. चंदनाचं लाकूड ५ ते ६ हजार रूपये प्रति किलो विकलं जातं. अशात जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, जगात असंही लाकूड आहे जे सोन्यापेक्षाही जास्त किंमतीत विकलं जातं तर हैराण व्हाल.
ज्या लाकडाबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते आहे आफ्रिकन ब्लॅकवुड (African Blackwood). या लाकडाला पृथ्वीवरील सर्वात मूल्यवान लाकूड मानलं जातं. हे दुर्मीळ लाकूड मध्य आणि दक्षिण आफ्रिकेच्या २६ देशांमध्ये आढळतं. या लाकडाच्या एक किलोला ८ हजार पाउंड म्हणजे ७ लाख रूपये किंमत मिळते. म्हणजे या लाकडाच्या एक किलोच्या किंमतीत तुम्ही कार खरेदी करू शकता.
आफ्रिकी ब्लॅकवुड (African Blackwood) महागडं असल्याने हे दुर्मीळ आहे. हे झाड ठीकपणे तयार होण्याला ६० वर्षापर्यंतचा वेळ लागतो. यांची उंची जवळपास २५ ते ४० फूट असते. ही झाडे कोरड्या जागेवर जास्त असतात. हे झाड फार कमी प्रमाणात आहेत आणि डिमांड जास्त आहे. त्यामुळे त्यांची किंमत सतत वाढत आहे.
आफ्रिकन ब्लॅकवुड लाकडाचा जास्तीत जास्त वापर शहनाई, बासरी आणि गिटारसारखी वाद्ये तयार करण्यासाठी केला जातो. त्यासोबतच या लाकडापासून मजबूत आणि टिकाऊ फर्नीचर तयार केले जातात. हे फर्नीचर फार महागडे असतात. श्रीमंत लोकचं हे खरेदी करतात.
फार महागडं असल्याने आफ्रिकन ब्लॅकवुडचे दुश्मनही जास्त आहेत. तस्कर झाड व्यवस्थित वाढायच्या आतच तोडतात. चंदनाच्या झाडांप्रमाणे यांची बेकायदेशीर कापणी करावी लागते. हे झाड दुर्मीळ श्रेणीत येतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केनिया, तंजानियासारख्या देशात या झाडांची तस्करी सामान्य आहे. जंगलात ही झाडे वाचवण्यासाठी सिक्युरिटी लावली आहे.