झाडं फक्त धरतीवरच्या सगळ्या प्राण्यांना सावलीच देत नाहीत तर माणसांच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी झाडं उपयुक्त असतात. माणसांना जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात. त्यामुळे झाडांशिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाच कुणीही करू शकत नाही.
आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या आणि अनोख्या झाडाबाबत सांगणार आहोत. हे झाडं इतर झाडांप्रमाणे फक्त सावलीच देतं असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण या झाडाने तहान सुद्धा भागवली जाऊ शकते. होय. या झाडाला कापल्यानंतर चक्क पाणी बाहेर येतं. या झाडाला Terminalia Tomentosa असं म्हणतात. या झाडाबाबत मगरीच्या पाठीचा उल्लेख सुद्धा केला जातो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी दिग्विजय सिंह खाती यांनी या व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. कठीण परिस्थितीत हे झाड तुमची तहान भागवू शकतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस झाडाला खाचा पाडत आहे. त्यानंतर वेगाने पाण्याचा फवारा बाहेर येत आहे. माणसं आपली तहान भागेपर्यंत पाणी पीत आहेत.
हे झाड दक्षिण भारतात दिसून येतं. तामिळनाडूच्या जंगलात ही वृक्ष सगळ्यात जास्त दिसून येतात. असं मानलं जातं की, वनअधिकारी आणि तज्ज्ञांनाही या झाडांच्या वैशिष्ट्यामागचं कारण अद्याप समजलेले नाही. या झाडाला खाचा पाडल्यानंतर १ लिटर पाणी बाहेर येऊ शकतं. अनेकदा आदिवासी लोक आपली तहान भागवण्यासाठी या झाडाला खाचा पाडतात.
काळापुढे 'ते' ही हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले