डॉक्टरांना देव म्हटलं जातं, ते खरचं आहे. याची प्रचिती दिल्लीतील एका रुग्णालयात आली आहे. काम करत असताना एका माणसाचा हात पूर्णपणे मशिनमध्ये अकडला त्यामुळे हाताचे दोन तुकडे पडले. अनेक तासांच्या ऑपरेशननंतर रुग्णाचा तुटलेला जोडण्यात यश आलं आहे. दिल्लीतील प्रल्हादपूरमधील एका फॅक्ट्रीत काम करत असलेले ३६ वर्षीय इंद्रपाल यांचा हात मशीनमध्ये अडकला.या घटनेनंतर फॅक्ट्रीच्या मालकानं इंद्रपाल यांना गंगाराम रुग्णालयात पोहोचवेले. तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरला संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. या माणसाच्या कापल्या गेलेल्या हाताचीही डॉक्टरांनी पाहाणी केली.
गंगाराम रुग्णालयातील प्लास्टीक, रिकंस्ट्रक्टिव सर्जन डॉक्टरांनी या रुग्णावर ६ तासांची सर्जरी केली. त्यानंतर इंद्रपाल यांचा हात पुन्हा जोडण्यात आला. मशिनमध्ये मार लागल्यानं या माणसाच्या हाताला अजूनही ७ ते ८ इंचाची जखम आहे. कारण डॉक्टरांनी हाताच्या दोन्ही बाजूंच्या खराब भागांना काढून टाकलं. प्लास्टीक, रिकंस्ट्रक्टिव सर्जन अनुभव गुप्ता यांनी रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यामुळे याला गोल्डन अवर म्हटलं आहे. इंद्रपाल यांना रुग्णालयात आणण्याआधी त्यांचा हात एका पॉलिथीन बॅगमध्ये ठेवला होता. त्यानंतर तो हात पुन्हा जोडण्यात आला.बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अशा केसेसमध्ये जितका जास्त वेळ लागतो, तितकी जास्त जोखिम वाढते. इंद्रपाल यांच्या हाताची लांबी काही प्रमाणात कमी झाली आहे. विशेष म्हणजे या हातात रक्तप्रवाह सुरळीत झाल्यामुळे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. आता त्यांचा हात पुन्हा चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात