'या' नव्या शोधामुळे बदलू शकतो चीन इतिहास, वैज्ञानिकांनी शोधला 'रहस्यमय खजिना'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:27 PM2021-03-23T14:27:09+5:302021-03-23T14:37:50+5:30
Chinese Civilization: पुरातत्ववाद्यांना शोधात एक अद्भुत सोन्या मुकूट सापडला आहे. तज्ज्ञांनी अंदाज लावला की, हा मुकूट प्राचीन संस्कृतीतील पुजाऱ्याचा असू शकतो.
चीनचाइतिहास आता बदलून शकतो किंवा नव्याने समोर येऊ शकतो. कारण चीनच्या(China) दक्षिण-पश्चिम भागात पुरातत्ववाद्यांना एका मोठा खजिना हाती लागला आहे. पुरातत्ववाद्यांनी एक वस्तू शोधली आहे ज्याचा संबंध एका अज्ञात संस्कृतीसोबत असल्याचं दिसतं. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर या खजिन्यामागची कहाणी समोर आली तर कदाचित चीनचा इतिहास (Chinese Civilization) बदलू शकतो.
नेमकं काय सापडलं?
पुरातत्ववाद्यांना शोधात एक अद्भुत सोन्या मुकूट सापडला आहे. तज्ज्ञांनी अंदाज लावला की, हा मुकूट प्राचीन संस्कृतीतील पुजाऱ्याचा असू शकतो. या सुंदर मुकूटाा शोध सिचुआन प्रांतातील गुआनघानमधील शानक्सीगदुई येथील लागला. संसोशधकांना वाटतं की, शोधात सापडलेले अवशेष एका खास विकसित संस्कृतीचा भाग असू शकतात. जी हजारो वर्षांआधी अस्तित्वात राहिली असेल.
चीनच्या सरकारी अधिकारी आणि संशोधकांनी सांगितले की, चीनच्या इतिहासात कुठेही या संस्कृतीचा उल्लेख नाही. संशोधकांनी या ठिकाणी २०१९ मध्ये खोदकाम सुरू केलं होतं. आतापर्यंत येथील खोदकामात सोनं, कांस्य आणि हस्तीदंतापासून तयार केलेल्या ५०० कलाकृती सापडल्या आहेत. या सर्व कलाकृती ३ हजार वर्ष जुन्या असल्याचं सांगितलं जात आहे.
सोन्याचा मास्क
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या खोदकामात पुरातत्ववाद्यांना एका सोन्याचा मास्कही मिळाला आहे. हा मास्क त्या रहस्यमय संस्कृतीत घातल होते. हे अवशेष ३.५ ते १९ वर्गमीटर भागात सापडले आहेत. तसेच या शोधातून संशोधकांना 'शू संस्कृती' बाबतही खूप माहिती मिळाली आहे.
आणखी काय सापडलं?
या खोदकामात चीनी संस्कृतीसंबंधी अनेक वस्तू सापडल्या आहेत. ज्यात चिमणीच्या आकाराचे सोन्याचे दागिने, सोन्याचे पत्रे, कास्यांचा मास्क, कास्यांचे झाड, हस्तीदंताचे दागिने यांचा समावेश आहे. एका संशोधकाने सांगितले की, या शोधातून 'शू संस्कृती'बाबत बरीच माहिती मिळते.