७ अरबची मशीन जी एकटीच करत होती ४० हजार लोकांचं काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:14 AM2019-01-31T11:14:50+5:302019-01-31T11:15:19+5:30

'बॅगर २८८' ही जगातली सर्वात मोठी मशीन होती. आता ही मशीन बंद करण्यात आली आहे.

Bagger 288 the worlds largest land vehicle equals 40000 workers | ७ अरबची मशीन जी एकटीच करत होती ४० हजार लोकांचं काम!

७ अरबची मशीन जी एकटीच करत होती ४० हजार लोकांचं काम!

Next

'बॅगर २८८' ही जगातली सर्वात मोठी मशीन होती. आता ही मशीन बंद करण्यात आली आहे. या मशीनचं डिझाइन पाहून तुम्हाला नक्कीच डायनासॉरची आठवण येईल. ही मशीन तयार करण्यात आल्यावर पर्यावरण प्रेमींनी यावर जोरदार टिका केली होती. ही एकटी मशीन ४० हजार लोकांच्या बरोबरीचं काम करायची. या मशीनने हमबाख जंगलाचा मोठा भाग नष्ट केला होता. 

जगातली सर्वात मोठी मायनिंग मशीन

१९७८ मध्ये आलेल्या बॅगर २८८ मशीन जर्मन कंपनी ग्रुपने कोळशाची खाणीत खोदकाम करण्यासाठी तयार केली होती. रिपोर्टनुसार, बॅगर २८८ जमिनीवर सर्वात जड आणि मोठ्या मायनिंगसाठी प्रसिद्ध होती. आश्चर्याची बाब म्हणजे ही मशीन तयार करण्यासाठी १०० मिनियन डॉलक(७ अरब रूपये) खर्च आला होता. 

१० वर्षात मशीन तयार

या मशीनच्या डिझाइनसाठी आणि याचे पार्ट्स तयार करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागला. तर पार्टस तयार झाल्यानंतर ते जोडण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागला. २२५ मीटर उंच आणि ९६ मीटर लांब या मशीनचं वजन १३ हजार टन इतकं होतं. 

शक्तीशाली मशीन

या मशीनच्या मदतीने जर्मनीच्या हमबाख जंगलातून दररोज २,४०,००० टन कोळसा काढला जात होता. म्हणजे या मशीनमध्ये इतकी शक्ती होती की, ही मशीन केवळ एका दिवसात फुटबॉलचं मैदान ३० मीटर खोल खोदू शकत होती. 

५ लोक मिळून चालवायचे

एका तासात केवळ १०० ते ६०० मीटरचं अंतर पार करणाऱी ही मशीन ५ लोक मिळून चालवायचे. अर्थातच या मशीनसाठी ऊर्जाही जास्त लागत असेल. 

रिपोर्टनुसार, २००१ च्या फेब्रुवारी महिन्यात या मशीनला हमबाख जंगलातून हटवण्यासाठी इतर लहान मशीन आणल्या गेल्या. पण ही मशीन तेथून हलवण्यासाठी दीड कोटी जर्मन मार्क खर्च करण्यात आले.
 

Web Title: Bagger 288 the worlds largest land vehicle equals 40000 workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.