बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील डेहरी येथील महिला पोलीस स्टेशन शुक्रवारी लग्न मंडपात बदललं होतं. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली इथे एका प्रेमी युगुलाचं लग्न लावून देण्यात आलं. यादरम्यान प्रियकराने त्याच्या बालपणीच्या प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं आणि सप्तपदी घेतली.
महिला पोलीस अधिकारी माधुरी कुमारीने सांगितलं की, 'टंडवा गावातील प्रियकर अभयकांत आणि पडुहार गावातील प्रेयसी यांच्या अनेक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. पण मुलीकडच्यांना आणि मुलाकडच्यांना दोघांचं लग्न मान्य नव्हतं. तेव्हा तरूणीने याची तक्रार पोलिसात केली. यानंतर आम्ही तरूणाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. जिथे तरूणाने लग्न करण्यास तयारी दाखवली. दोघांचीही तयार जाणून घेतल्यावर आम्ही दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांचं लग्न लावून दिलं'. (हे पण वाचा : Shocking! लव्ह मॅरेजच्या १० महिन्यांनंतर पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न, व्हिडीओ पाहून पती 'कोमात')
असं सांगितलं जात आहे की, या लग्नासाठी प्रियकर आणि प्रेयसीचे कुटुंबिय तयार नव्हते. लग्नासाठी प्रेयसी आपल्या घरातून ४ वेळा पळून गेली होती. मात्र, लग्नावेळी दोन्ही पक्षातील नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. माधुरी कुमारी यांनी सांगितलं की, लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पोलिसांनी लग्नाचं साहित्य गोळा करण्यास सुरूवात केली आणि पंडिताला बोलवलं. यानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाला आशीर्वाद दिले.