हयात नसलेल्या वडिलांना मुलीने लग्नात असं करून घेतलं सहभागी, कसं ते वाचून व्हाल भावूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:04 PM2019-10-09T13:04:53+5:302019-10-09T13:13:14+5:30
ब्रिटनमधील एका मुलीचे वडील तिच्या लग्नाच्या काही दिवसांआधीच वारले होते. पण तरी सुद्धा ते तिच्या लग्नात हजर होते.
घरातील लग्न कार्य असो वा कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असो घरातील एखादी व्यक्ती त्यात नसेल किंवा ती व्यक्ती नेहमीसाठी तुमच्यापासून दूर गेली असेल तर त्या व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तसंच मुलीच्या लग्नात जर वडील नसतील तर याचं दु:खं एक मुलगीच समजू शकते. ब्रिटनमधील एका मुलीचे वडील तिच्या लग्नाच्या काही दिवसांआधीच वारले होते. पण तरी सुद्धा ते तिच्या लग्नात हजर होते.
येथील एका मुलीच्या वडिलांचं निधन चार महिन्यांआधीच झालं होतं. मग तिने लग्नाच्या दिवशी अॅक्रेलिक नखांमध्ये वडिलांच्या अस्थी सजवून त्यांची आठवण जपली आणि त्यांना अशाप्रकारे तिच्या लग्नात सहभागी करून घेतले. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, चार्लोट वॉटसन आणि तिचा पती निकने लग्नाची तारीखही पुढे ढकलली होती. कारण शॉर्लेटचे वडील बार्बर यांचं कॅन्सरने निधन झालं होतं.
शॉर्लेटचे वडील तिच्या लग्नाच्या काही दिवसांआधीच हे जग सोडून गेले होते. अशात शॉर्लेटची चुलत बहीण क्रिस्टी मीकिन एक नेल आर्टिस्ट आहे. तिने शॉर्लेटच्या वडिलांच्या अस्थींचा डिझाइनमध्ये वापर केला. यावर शॉर्लेट म्हणाली की, 'मला वास्तवात असं वाटत होतं की, ते आमच्यासोबत आहेत'.
मीकिनचे यूट्यूबवर साधारण १० लाखांपेक्षा अधिक सब्सक्रायबर आहेत. ती म्हणाली की, अस्थी एका छोट्या काचेच्या बरणीत होत्या आणि आम्ही त्यातील काही अस्थी आम्ही नेल आर्टमध्ये वापरण्यासाठी काढून ठेवल्या होत्या. तिला शॉर्लेटच्या नखांवर अॅक्रेलिकमध्ये अस्थी सजलेल्या बघायच्या होत्या.
शॉर्लेट म्हणाली की, तिला हे बघून अजिबातच विश्वास बसला नाही की, अस्थींचा वापर करून तिच्या नखांवर गुलाबी, ग्रे आणि पांढऱ्या रंगाच्या डिझाइनसोबत जेम्सही सजलेले होते.